Lok Sabha Polling : सोलापूर, माढ्यात ७ मे रोजी मतदान; उमेदवाराच्या शोधात माढ्यात ‘मविआ’ची, सोलापुरात भाजपची दमछाक

केंद्रीय निवडणूक आयोगाने केलेल्या घोषणेनुसार जिल्ह्यातील सोलापूर आणि माढा या दोन्ही लोकसभा मतदारसंघात आजपासून ५१ व्या दिवशी म्हणजे ७ मे रोजी मतदान होणार आहे.
Lok Sabha Polling
Lok Sabha Polling Sakal
Updated on

Solapur News : केंद्रीय निवडणूक आयोगाने केलेल्या घोषणेनुसार जिल्ह्यातील सोलापूर आणि माढा या दोन्ही लोकसभा मतदारसंघात आजपासून ५१ व्या दिवशी म्हणजे ७ मे रोजी मतदान होणार आहे. जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसाठी जवळपास दोन महिने प्रचाराची रणधुमाळी चालणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून लोकसभेची आचारसंहिता कधी लागणार याची चर्चा रंगली होती. अखेर आज निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या वेळापत्रकाची घोषणा केल्यानंतर आचारसंहिता लागू केली.

आचारसंहितेपूर्वी प्रशासकिय मान्यतेचा सपाटा लावणाऱ्या यंत्रणांनी आज मोकळा श्‍वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषद, महापालिका, नगरपरिषद व पंचायत समित्यांमध्ये प्रशासकिय कामांना मान्यता देण्यासाठी शासकिय यंत्रणा, आमदार व खासदार, त्यांचे स्वियं सहाय्यक कमालीच्या धावपळित दिसत होते.

भाजपने राज्यातील उमेदवारांच्या पहिल्या यादीत माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देऊन बाजी मारली आहे. या उमेदवारीमुळे नाराज झालेल्या मोहिते-पाटील व आमदार रामराजे नाईक निंबाळकर समर्थकांची कशी समजूत काढायची? हा नवा प्रश्‍न मात्र भाजपसमोर उभा राहिला आहे.

दोन टर्मपासून भाजपच्या ताब्यात असलेल्या सोलापूर लोकसभा मतदार संघातील उमेदवारी जाहीर करताना यंदा भाजपची दमछाक होताना दिसत आहे. सोलापुरात भाजपकडून यावेळी स्थानिक व ‘ओरिजनल एस.सी.’ उमेदवार देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्यातून माळशिरसचे आमदार राम सातपुते, माजी खासदार अमर साबळे, माजी खासदार शरद बनसोडे, उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांची नावे समोर येऊ लागली आहे.

काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापुरची उमेदवारी निश्‍चित मानून मंगळवेढा, मोहोळ, दक्षिण सोलापूर व सोलापूर शहरात प्रचाराला सुरुवातही केली आहे. माढ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्याकडे सध्या तुल्यबळ उमेदवार दिसत नाही.

मोहिते-पाटलांची नाराजी, शरद पवार व उध्दव ठाकरे यांच्याबद्दल असलेली सहानभुती यामुळे माढ्यात चांगला उमेदवार दिला तर येथे विजयाचा गुलला उधळण्याची स्वप्न राष्ट्रवादीला पडू लागली आहेत.

त्यातूनच आता रासपचे नेते महादेव जानकर, कै. गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख, करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील यांची नावे समोर येऊ लागली आहे. येत्या चार ते पाच दिवसांमध्ये उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यानंतर खऱ्या अर्थाने राजकिय रणधुमाळीला वेग येणार आहे.

सोलापूर अन्‌ माढ्यात लागणार कस

सोलापूर लोकसभा मतदार संघात सोलापूर शहरासोबतच अक्कलकोट, मोहोळ, पंढरपूर शहर व ग्रामीणचा काही भाग, मंगळवेढा, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर हे तालके येतात. माढा लोकसभा मतदार संघात करमाळा, माढा,

माळशिरस, सांगोला या सोलापूर जिल्ह्यातील तालुक्यांशिवाय सातारा जिल्ह्यातील फलटण, माण, खटाव व कोरेगाव तालुक्यातील काही गावे येतात. उन्हाचा कडाका वाढत असताना अवघ्या ५० दिवसांमध्ये मतदारसंघ पिंजून काढण्याचे मोठे आव्हान उमेदवारांच्या समोर असणार आहे. वाड्या-वस्तीवरील मतदारांपर्यंत पोचण्यासाठी उमेदवारांचा कसं लागणा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.