Madha Lok Sabha: भाजपची डोकेदुखी वाढणार? माढ्यात उमेदवारीवरून नाराजीनाट्य; मोहिते पाटलांविरोधात निंबाळकरांचं शक्तीप्रदर्शन

Madha Lok Sabha: माढा मतदार संघात सध्या उमेदवारीवरून सुरू झालेला वाद आता भाजपची डोकेदुखी बनू लागल्याचं चित्र आहे.
Madha Lok Sabha
Madha Lok SabhaEsakal
Updated on

Madha Lok Sabha: माढा मतदार संघात सध्या उमेदवारीवरून सुरू झालेला वाद आता भाजपची डोकेदुखी बनू लागल्याचं चित्र आहे. माढा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून नाराज झालेल्या मोहिते-पाटील यांच्या अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावर मतदारसंघातील मातब्बर नेत्यांनी आज हजेरी लावत खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या उमेदवारीला जोरदार विरोध केला.

या निमित्त उमेदवारीत डावलेल्या मोहिते-पाटलांनी भाजपेत्तर पक्षातील ताकदवर नेत्यांची मोट बांधत जोरदार शक्तीप्रदर्शन केले. यामध्ये महायुतीतील घटक पक्षांचे नेतेही उपस्थित होते. आज दिवसभरातील शिवरत्न बंगल्यावरील नाराजीनाट्याच्या खलबत्यांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते.

भाजपने माढा मतदारसंघातून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनाच पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर रविवारी मोहिते- पाटलांच्या अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावर मतदारसंघातील अनेक दिग्गज नेत्यांनी भेट दिली.

त्यात विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील, सातारा जिल्हा परीषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे निंबाळकर, रघुनाथराजे निंबाळकर, फलटणचे आमदार दीपक चव्हाण, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील, सांगोल्यातील डॉ. बाबासाहेब देशमुख, डॉ. अनिकेत देशमुख, माजी आमदार जयवंतराव जगताप, संजय कोकाटे, शिवाजी कांबळे यांच्यासह माण- खटाव व सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख नेते उपस्थित होते.

Madha Lok Sabha
Sharad Pawar : फसविणाऱ्यांना मतदानाद्वारे बाहेर करा! शरद पवार यांचे भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोप सभेत आवाहन

या नेत्यांमध्ये सुमारे दोन तास बंद दरवाजाआड बैठक पार पडली. बैठकीनंतर रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले, विजयसिंह मोहिते पाटील यांनी स्नेहभोजनासाठी बोलावले होते. आज कुठेही राजकीय चर्चा झालेली नाही. आजच्या घटकेला विजयदादांची विचारपूस करण्यासाठी आम्ही आलो होतो. त्यांचे आमच्यावर उपकार असल्यामुळे आम्ही त्यांना भेटायला आलो आहोत. मोहिते पाटील हे माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवार मिळाली नाही म्हणून नाराज आहेत, असं काहीही नाही. आम्हाला विजयदादांनी बोलावलं; म्हणून आम्ही आलो होतो.

Madha Lok Sabha
Baramati Lok Sabha 2024: "शरद पवारांचा पराभव करायचा, इतना काफी है..."; चंद्रकांत पाटलांनी दंड थोपटले!

राज्याच्या राजकारणाला दहा दिवसांत कलाटणी

अकलूजची भूमी महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींना कलाटणी देणारी आहे. येत्या १० दिवसांत महाराष्ट्राचे संपूर्ण राजकारण बदललेले दिसेल, असे भाकित शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त करून खळबळ माजवून दिली. आपणाला शरद पवारांनी पाठविले आहे का, या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी मला कोणीच पाठवले नसले तरी इंडिया आघाडीत शरद पवारांचे शब्द प्रमाण मानतात. त्यामुळे आपण त्यांना सांगून आल्याचेही स्पष्ट केले.

Madha Lok Sabha
LoKsabha Election 2024: नरेंद्र मोदी, राहुल गांधी... लोकसभा निवडणुकीत महत्त्वाचे ठरणारे 10 नेते कोण?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.