सोलापूर - संसदेच्या विशेष अधिवेशनाला सोमवारपासून सुरवात झाली आहे. १३ वर्षापासून प्रलंबित असलेले महिला विधेयक आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत मांडले. या विधेयकाला नारीशक्ती वंदन अधिनियम असे नाव देण्यात आले आहे. (लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)
नारीशक्ती वंदन अधिनियम कायद्याच्या माध्यमातून महिलांना लोकसभेत व विधानसभेत ३३ टक्के आरक्षण मिळणार आहे. याच पार्श्वभूमीवर, सोलापुरातील आजी-माजी लोकप्रतिनिधींनी ‘सकाळ’शी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाचे स्वागत करत अभिनंदन केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारीशक्ती वंदन विधेयक आज संसदेत मांडले. याचे मी प्रथमतः अभिनंदन करतो. बारा वर्षांपूर्वी काँग्रेसने राज्यसभेत हे विधेयक मांडले होते. ते विधेयक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढे आणले हे अतिशय कौतुकास्पद आहे. या विधेयकाला आमचा पाठिंबा आहे.
- सुशीलकुमार शिंदे, माजी केंद्रीय गृहमंत्री
आरक्षणामुळे खऱ्या अर्थाने महिलांना राजकारणामध्ये संधी मिळणार आहे. केंद्र शासनाचे खूप चांगले पाऊल आहे. ग्रामीण भागातील महिलांमध्ये शिक्षण तसेच वैचारिक बैठक निर्माण होऊन २०२९ नंतरच्या महिलांच्या भावी पिढीला स्वतः निर्णय घ्यायची क्षमता निर्माण होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आत्तापर्यंत महिला निवडून आल्या तरीही बहुतांश ठिकाणी कुटुंबातील प्रमुख व्यक्तीच कारभार पाहात होते. महिलांसाठी, भावी पिढीसाठी केंद्रातील सरकारने घेतलेला निर्णय योग्यच आहे.
- वर्षा ठोंबरे-झाडबुके, बार्शी
२०१० मध्ये युपीए सरकारने महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मंजूर करण्याचा ठोस प्रयत्न केला होता. या विधेयकाला काही खासदारांचा विरोध होता. इंदिरा गांधी, सोनिया गांधी या विषयासाठी प्रयत्नशील होते. सोनिया गांधी यांचे मी आभार मानते. त्यांच्या प्रयत्नाला आज यश आले आहे .पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत मांडलेले या विधेयकाचा आम्ही स्वागत करतो व सहकार्य करणार आहोत.
- प्रणिती शिंदे, आमदार, काँग्रेस
खऱ्या अर्थाने महिला वर्गाला या विधेयकाच्या माध्यमातून न्याय मिळाला आहे. खूप महिला सध्या ऍक्टिव्ह असून स्थानिक स्वराज्य निवडणुका पुरत्या मर्यादित न राहता देश पातळीवर आता त्यांना संधी मिळणार आहे. ज्या ठिकाणी महिला वर्ग ऍक्टिव्ह असतात तेथील परिवार,गाव, देश सुद्धा समृद्ध बनतो.
- सुभाष देशमुख, आमदार, भाजप.
पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात अनेक पक्ष एकत्र आलेत. त्या पक्षांनी यावर चिंतन करण्याची गरज आहे. माय बहिणींचा सन्मान करणारा निर्णय झाला आहे. आणि ह्यानिर्णय होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या महिला वर्गाचे दैवत सावित्रीबाई फुले यांना हा निर्णय समर्पित केला पाहिजे.
- ॲड. कोमल साळुंखे-ढोबळे, प्रदेशाध्यक्षा, बहुजन रयत परिषद
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.