मनोज जरांगे पाटील यांच्या पंढरपूरच्या सभेला "मी पैसे दिले" असे वादग्रस्त विधान रणजित शिंदे यांनी पाच सहा महिन्यांपूर्वी केले होते.
पंढरपूर : सोलापूर जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माढ्याचे आमदार बबनराव शिंदे (Babanrao Shinde) यांचे पुत्र रणजित शिंदे (Ranjit Shinde) यांनी गुरुवारी (ता. 22) रात्री अचानक अंतरवाली सराटी येथे जाऊन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची भेट घेतली. भेटीचा तपशील मात्र अद्याप समजू शकला नाही.