Solapur News : माढ्यात ८ तर सोलापुरात १० अर्ज अपात्र; उद्या अर्ज माघारीनंतर चिन्हांचेही होणार वाटप

लोकसभा निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जाची छाननी प्रक्रिया आज महसूल भवनातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनात झाली. माढा लोकसभा मतदार संघासाठी ३८ उमेदवारांचे ४७ अर्ज पात्र ठरले आहेत.
madha lok sabha 8 solapur 10 nomination disqualified election vote
madha lok sabha 8 solapur 10 nomination disqualified election voteSakal
Updated on

सोलापूर : लोकसभा निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जाची छाननी प्रक्रिया आज महसूल भवनातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनात झाली. माढा लोकसभा मतदार संघासाठी ३८ उमेदवारांचे ४७ अर्ज पात्र ठरले आहेत.

चार उमेदवारांचे आठ अर्ज अपात्र ठरले आहेत. सोलापूर लोकसभेसाठी ३२ उमेदवारांचे ४३ अर्ज पात्र ठरले आहेत. ९ उमेदवारांचे दहा अर्ज अपात्र ठरले आहेत. छाननी प्रक्रियेत पात्र ठरलेल्या अर्जांची माघार, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना चिन्ह वाटपची प्रक्रिया सोमवारी (ता. २२) केली जाणार आहे. माढा व सोलापूरसाठी किती उमेदवार कायम राहतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

माढ्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या अर्जावर घेण्यात आलेली हरकत फेटाळण्यात आली आहे. त्यांचा अर्ज मंजूर झाला आहे. सोलापुरातील भाजप उमेदवार तथा आमदार राम सातपुते यांच्या अर्जावर घेण्यात आलेली हरकत फेटाळण्यात आली आहे. त्यांचाही अर्ज मंजूर झाला आहे. सोलापुरातील काँग्रेस उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या अर्जावर घेण्यात आलेली हरकत फेटाळण्यात आली आहे. त्यांचाही अर्ज मंजूर झाला आहे.

माढ्यातील यांचे अर्ज बाद

‘माढा मतदार संघातील मोहिते पाटील विजयसिंह शकरराव, दादा विश्‍वनाथ लोखंडे, गणपत परमेश्‍वर भोसले, डॉ. नितीन सोपानराव वाघे यांचे अर्ज बाद झाले. सोलापुरातील नेमक्या कोणत्या उमेदवारांचे अर्ज बाद झाले याची माहिती रात्री उशिरापर्यंत मिळू शकली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.