Madha Lok Sabha : फलटण तालुक्यात कोण ठरणार बाहुबली? माढा लोकसभा मतदारसंघात रामराजे-रणजितसिंहांची प्रतिष्ठा पणाला

Naik Nimbalkar : फलटण तालुक्यावर विधान परिषदेचे माजी सभापती आमदार रामराजे नाईक-निंबाळकर यांचे गेली तीस वर्षे वर्चस्व आहे.
Madha Lok Sabha
Madha Lok SabhaeSakal
Updated on

- किरण बोळे

माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी जाहीर करण्यावरून महायुतीमधील घटक पक्षांतील नेत्यांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते रामराजे नाईक-निंबाळकर व भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली असून, फलटण तालुक्यात कोण ठरणार बाहुबली? याबाबत विविध तर्कवितर्क लढविले जात आहेत.

फलटण तालुक्यावर विधान परिषदेचे माजी सभापती आमदार रामराजे नाईक-निंबाळकर यांचे गेली तीस वर्षे वर्चस्व आहे. आमदार रामराजे यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून कृष्णेच्या पाण्याचा महत्त्वाचा प्रश्न अत्यंत कौशल्याने सोडविला. पाच वर्षांचा कालावधी उपलब्ध असताना राज्याच्या वाट्याच्या ५९४ टीएमसी पाण्याचा वापर दाखवून त्यावरील राज्याचा हक्क अबाधित तर राखलाच; पण फेरवाटपात आणखी ८१ टीएमसी पाणी मिळविण्यात व कायम दुष्काळी पट्टा बागायती करण्यात ते यशस्वी ठरले.

त्याचबरोबर रामराजे यांना खंडकरी शेतकऱ्यांना त्यांच्या शेकडो एकर जमिनी पाटपाण्याच्या हक्कासह सन्मानपूर्वक परत करण्यात मोठे यश प्राप्त झाले. धोम-बलकवडीसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाद्वारे कायम दुष्काळी पट्ट्यात पाणी पोचविताना राज्यातील अन्य दुष्काळी तालुक्यांसाठी विविध पाटबंधारे योजना राबविताना सातारा जिल्ह्यातील माण, खटाव, कोरेगाव उत्तर, खंडाळा या तालुक्यांतील कायम दुष्काळी तालुक्यांना प्राधान्याने कृष्णेचे पाणी मिळाले पाहिजे, यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न सर्वश्रुत आहेत.

दुसरीकडे २०१९ मध्ये निवडून आलेल्या खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी आपल्या पाच वर्षांच्या कारकिर्दीत आपल्या मतदारसंघातील प्रलंबित पाटबंधारे प्रकल्पांच्या कामांसाठी निधीच्या तरतुदी करून घेऊन एकेक प्रकल्प मार्गी लावत फलटण, माळशिरस, माण, खटाव, कोरेगाव, सांगोला, माढा, करमाळा आदी तालुक्यांतील शेतीच्या पाण्याचा प्रश्न टप्प्याटप्प्याने मार्गी लावला.

Madha Lok Sabha
Solapur Lok Sabha : सातपुतेंचा ‘मॉर्निंग वॉक’वेळी विकासावर संवाद; श्री सिद्धरामेश्वर देवस्थान तलावाभोवतीच्या वॉकिंग ट्रॅकवर कार्यक्रम

लोणंद-फलटण- बारामती रेल्वे मार्गाचे प्रलंबित काम हातात घेऊन पहिल्या टप्प्यात लोणंद-फलटण रेल्वेचे काम पूर्ण करून घेऊन त्यावरून रेल्वे वाहतूक सुरू करताना फलटण-बारामती रेल्वे मार्गाला असलेला राजकीय विरोध डावलून ते कामही गतीने सुरू करून त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून दिला. स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रलंबित असलेल्या फलटण-पंढरपूर रेल्वे मार्गाचे फेरसर्वेक्षण करून नव्याने या रेल्वे मार्गाला मंजुरी, त्यासाठी आर्थिक तरतुदी करून घेऊन हे काम आगामी दोन वर्षांत पूर्ण होईल, यासाठी संपूर्ण व्यवस्था करण्यात निंबाळकर यशस्वी झाले आहेत.

सद्य:स्थितीत महायुतीत असतानाही रामराजे यांनी उघडपणे खासदार रणजितसिंह यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. रणजितसिंहांना संसदेऐवजी घरचा रस्ता दाखविण्यासाठी त्यांनी दंड थोपटले आहेत. त्यातच त्यांच्या गटाच्या गोपनीयपणे बैठका सुरू झाल्या असून, खासदार रणजितसिंह यांना पराभूत करायचेच, यासाठी चंग बांधला आहे. दुसरीकडे खासदार रणजितसिंह यांनीही मतदारसंघातील पाच आमदार आपल्या बाजूने असल्याचे दाखवून दिले आहे. मात्र, धैर्यशील मोहिते-पाटील यांनी खासदारांच्या विरोधात दंड थोपटले असून, निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविली आहे.

Madha Lok Sabha
Solapur Lok Sabha Poll : पवारांच्या विरोधात लढत झाल्यास नशीबच - रणजितसिंह नाईक-निंबाळकर

अस्तित्वाची लढाई...

लोकसभेची ही निवडणूक राजकीय अस्तित्वाची ठरणार आहे. हा निकाल पुढील निवडणूक निकालांवर परिणाम करणारा ठरणार असल्याने रामराजे नाईक-निंबाळकर व रणजितसिंह नाईक-निंबाळकर या दोघांनीही ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.