सांगोला - माढा मतदारसंघातील पाण्याचा प्रश्न, उद्योगधंदे, नोकरीची समस्या, शेतीमालाला हमीभाव या मूलभूत प्रश्नांसह आजकाल तरुणांच्या लग्नांचा ज्वलंत प्रश्न उपस्थित होत आहे. मतदारसंघातील तरुणांची लग्नं करणं, हेच आपलं उद्दिष्ट असणार आहे. हा प्रश्न माढा मतदार संघातीलच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातला प्रश्न आहे. या प्रश्नावर प्रामुख्याने मी काम करणार असल्याचे मत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार रमेश बारसकर यांनी व्यक्त केले.
माढा लोकसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार रमेश बारसकर यांनी मंगळवारी (ता. २) सांगोल्यात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी बारसकर यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधताना एका वेगळ्या मुद्द्याला हात घातला आहे. माढा लोकसभा मतदारसंघासह राज्यभरातील तरुणांची ३० ते ३५ वर्षे उलटून गेल्यानंतरही लग्नं होत नाहीत.
त्यांच्या लग्नाची ही समस्या सोडविण्यासाठी आपण प्राधान्याने काम करणार आहे, अशी घोषणा त्यांनी केली. तसेच ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. तरुणपणी निवडणूक लढवली नाही तर काय म्हातारपणी निवडणूक लढवायची का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
शेकापच्या माजी नगरसेवकांची उपस्थिती चर्चेची
वंचित बहुजन आघाडीचे माढा लोकसभेचे उमेदवार रमेश बारसकर यांच्या सांगोल्यात झालेल्या पत्रकार परिषदेला शेकापचे माजी उपनगराध्यक्ष सुरेश माळी आणि माजी नगरसेवक गजानन बनकर हे उपस्थित होते. वंचित बहुजन आघाडीच्या पत्रकार परिषदेला शेकापच्या माजी नगरसेवकांची उपस्थिती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. यावेळी माजी नगरसेवक गजानन बनकर यांनी आपले विचारही व्यक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.