माघी दशमी व एकादशीला मिळणार नाही विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरात प्रवेश ! मंदिर समितीचा निर्णय 

1Vitthal_20Mandi
1Vitthal_20Mandi
Updated on

पंढरपूर (सोलापूर) : येत्या 28 फेब्रुवारीपर्यंत महाराष्ट्र शासनाने लॉकडाउन जाहीर केलेले आहे. त्याची दखल घेऊन गर्दी होऊ नये यासाठी माघी दशमी आणि एकादशी (ता. 22 व 23 फेब्रुवारी) असे दोन दिवस दक्षता म्हणून श्री विठ्ठल - रुक्‍मिणी मंदिरात भाविकांना सोडण्यात येणार नाही. द्वादशी (ता. 24) पासून पूर्ववत भाविकांना मुखदर्शनासाठी मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे, अशी माहिती श्री विठ्ठल - रुक्‍मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी पत्रकारांना दिली. 

माघी यात्रेच्या नियोजना संदर्भात आज (मंगळवारी) श्री विठ्ठल - रुक्‍मिणी मंदिर समिती सदस्यांची बैठक श्री. औसेकर महाराज यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांना माहिती दिली. या प्रसंगी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सुनील तथा विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, सदस्य व शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे, माधवी निगडे, शकुंतला नडगिरे, नगराध्यक्षा साधना भोसले आदी उपस्थित होते. 

श्री. औसेकर महाराज म्हणाले, कोरोनाचे सावट अजून पूर्ण संपलेले नाही. कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम सुरू असून, अद्याप अनेकांना लस देणे बाकी आहे. या पार्श्वभूमीवर येत्या 23 फेब्रुवारी रोजी माघी एकादशीचा सोहळा होणार आहे. त्या वेळी भाविक पंढरपूरला मोठ्या संख्येने येण्याची शक्‍यता आहे. हे लक्षात घेऊन गर्दी होऊ नये यासाठी दक्षता म्हणून दशमी आणि एकदशी असे दोन दिवस भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. 

श्री विठ्ठल - रुक्‍मिणी मंदिर भाविकांसाठी बंद असताना मंदिराच्या बाहेरच्या परिसरात भाविकांना येऊ द्यायचे किंवा नाही अशा विषया संदर्भात शासन निर्णय घेईल. यात्रा काळात एकदशीपासून पौर्णिमेपर्यंत परंपरेनुसार जे नियम चालत आलेले आहेत ते सर्व होतील, असेही श्री. औसेकर यांनी स्पष्ट केले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()