Maharashtra Kesari 2023: किसमे में कितना है दम : पैलवान सिकंदर शेखबाबतचा वाद थांबणार? सांगलीच्या तालीम संस्थेने शोधला मार्ग

सोलापूर जिल्ह्याच्या मातीतील सिकंदर शेख व महेंद्र गायकवाड दोन्हीही पैलवान असून सिकंदर शेख
Maharashtra Kesari Kusti 2023
Maharashtra Kesari Kusti 2023sakal
Updated on

ब्रह्मपुरी सोलापूर : सोलापूर जिल्ह्याच्या मातीतील सिकंदर शेख व महेंद्र गायकवाड दोन्हीही पैलवान असून सिकंदर शेख (ता. मोहोळ) गावचा पोरगा कोल्हापूर च्या गंगावेश तालमीत वस्ताद विश्वासदादा हारगुले यांच्याकडे सराव करतोय .

सिकंदर ने देशभरात अनेक कुस्ती मैदाने मारली असून नामांकित असणाऱ्या पैलवानांना चारी मुंड्याचीत करीत अस्मान दाखवले आहे .(Maharashtra Kesari 2023)

तर महेंद्र गायकवाड हा शिरशी गावचा पोरगा (ता. मंगळवेढा) तालुक्यातील असून पुण्याच्या काका पवार वस्तादच्या तालमीत सराव करतोय.दोन्हीही पैलवानचे बलदंड शरीर , मेहनतीत कस परंतु घरातील आर्थिक परिस्थिती नाजूक असून एक हमालाचा पोरगा तर दुसरा शेतकऱ्याचा पोरगा म्हणून राज्यभर अशी त्यांची ओळख.

महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील सेमी फायनल लढतीची प्रचंड चर्चा झाली. सेमी फायनलची लढत महेंद्र गायकवाड आणि सिंकंदर शेख यांच्यात झाली. या लढतीत महेंद्र गायकवाडने सिकंदरचा पराभव केला. या पराभवानंतर सिकंदर शेखची प्रचंड चर्चा सुरू आहे.

सिकंदर शेख हा सोशल मीडियावर हिरो ठरला आहे. सिकंदर पंचांच्या चुकीमुळे हरला आहे, त्याच्यावर अन्याय झाला आहे. अशी भावना सोशल मीडियावर व्यक्त होत आहे. तसेच, सिकंदरच्या आई-वडिलांनीही आपल्या लेकरावर अन्याय झाल्याची भावना बोलून दाखवली होती.

सेमी फायनल सामन्यात काय घडलं..?

सेमी फायनल सामन्यात सिकंदर आणि महेंद्र या दोघांनी आधी अंदाज घेत सावध सुरुवात केली. या दरम्यान महेंद्रने पहिला गुण मिळवला आणि आघाडी घेतली. त्यानंतर सिंकदरनेही आक्रमकता दाखवत प्रतिडाव टाकला आणि २ गुण मिळवले.

अशा प्रकारने सिकंदर २-१ ने पुढे होता. मात्र, यानंतर महेंद्र गायकवाडने एक डाव टाकला आणि ४ गुण खिशात घातले. महेंद्रचा हाच बाहेरची टांग नावाचा डाव वादात भोवऱ्यात सापडला आहे.

या डावावर राज्यभर प्रचंड चर्चा रंगली आहे. सोशल मीडिया चाहत्यांचे असे म्हणणे आहे की, महेंद्र गायकवाडने टाकलेला बाहेरील टांग हा डाव नियमानुसार नव्हता सिकंदर शेख डेन्जर पोझिशनला नव्हता मग त्याला ४ गुण का देण्यात आले? असे प्रश्न सोशल मीडियावर विचारला जात आहे.

सोशल मीडियात होत असलेला कुस्ती स्पर्धेचा वाद आता संपणार असून दोन्हीही मातब्बर पैलवानाची कुस्ती स्पर्धा व्हावी अशी भावना कुस्ती शौकीन व चाहत्यामधून सोशल मीडियातून होत आहे.

महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील सिकंदर शेखबाबतचा वाद थांबण्यासाठी सांगली- मिरज मधील अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते संजय भोकरे यांनी मार्ग शोधलाय.

पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील सेमी फायनलमध्ये पैलवान सिकंदर शेखवर अन्याय झाल्याच्या भावना अनेक जण व्यक्त करत आहेत. स्वत: सिकंदर शेख याने देखील आपल्यावर अन्याय झाल्याचे बोलून दाखवले आहे.

सेमी फायनलच्या लढतीत चुकीच्या पद्धतीने महेंद्र गायकवाड याला गुण दिल्याचा आरोप होत आहेत. परंतु, आता हा वाद थांबवण्यावर सांगलीतील अंबाबाई तालीम संस्थेने मार्ग शोधून काढलाय. महेंद्र गायकवाड आणि सिकंदर शेख यांच्यात पुन्हा कुस्ती घेण्याचा निर्णय या संस्थेने घेतलाय.

महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या माती गटातील अंतिम लढत सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड यांच्यात झाली. या लढतीत महेंद्रचा मारलेला टांग डाव पूर्णपणे बसला नसताना त्याला चार गुण दिल्याचा आरोप सोशल मीडियावरून होत आहेत.

हा फक्त सोशल मीडियापुरताच मर्यादित राहिला नाही तर तो आता पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचला आहे.

मुंबई पोलिस दलातील पोलिस कॉन्स्टेबल संग्राम कांबळे यांनी पंच मारूती सातव यांना फोनवरून धमकी दिल्याचा आरोप सातव यांनी केलाय. यावरून कॉन्स्टेबल संग्राम कांबळे यांच्यावर पुण्यात गुन्हा देखील दाखल झालाय. परंतु, सांगलीच्या अंबाबाई तालीम संस्थेने हा वाद मिटवण्यासाठीचा मार्ग शोधून काढलाय.

काय आहे मार्ग?

या वादाला तिलांजली देण्याची भूमिका सांगली- मिरज मधील अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते संजय भोकरे यांनी घेतलीय.

त्यासाठी त्यांनी पैलवान सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड यांच्यामध्ये मातीतील निकाली कुस्त्यांचे खास मैदान अंबाबाई तालीम संस्थेच्या मैदानात लवकरच घेण्याची तयारी दर्शवली आहे. या दोघांमध्ये झालेल्या कुस्ती मधील विजेत्याला महाराष्ट्र केसरीच्या तोलामोलाची चांदीची गदा देऊन आणि महाराष्ट्र महाकेसरीचा 'खिताब देऊन गौरविण्यात येणार आहे.

या मैदानात सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड यांनी येऊन लढावं आणि सध्या सुरू असलेला वाद थांबवावा अशी भूमिका शिवछत्रपती पुरस्कार विजेते संजय भोकरे वस्ताद यांनी घेतली आहे.

संजय भोकरे यांच्या या निर्णयाला पैलवान सिकंदर शेख याने प्रतिसाद देत या मैदानात येऊन लढण्याची तयारी देखील दर्शवली आहे. आता महेंद्र गायकवाडने देखील या मैदानात येऊन लढावे आणि हा कुस्ती मधील वाद थांबवावा असे आवाहन संजय भोकरे यांनी केले आहे.

"सिकंदर व महेंद्र ची कुस्ती व्हावी अशी धडपड आहे व आमची इच्छा आहे . कुस्त्यामध्ये राजकारण न आणता कुस्त्या झाल्या पाहिजे. दोन्हीही पैलवानाने ठरवले पाहिजे परत कुस्ती झाली पाहिजे. सिकंदर ने कुस्ती लढण्याची तयारी दर्शवली आहे.

तसेच महेंद्र चे वस्ताद काका पवार यांना आम्ही तसे पत्र दिले आहे. मॅटवर असणाऱ्या कुस्तीवर अवकळा आली आहे. तरी मातीतील कुस्त्या झाल्या पाहिजे. दोघांची कुस्ती व्हावी अशी अपेक्षा करतोय."

---- संजय भोकरे , अध्यक्ष आंबाबाई तालीम संस्था,सांगली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.