Maharashtra Police Bharti 2024 : सोलापूर शहर व ग्रामीण पोलिस दलातील पोलिस भरतीच्या मैदानी चाचणीला सुरूवात

छाती अन्‌ उंचीमुळे ११३ तरुण अपात्र; साडेतीनशे उमेदवार गैरहजर
maharashtra police bharti physical exam
maharashtra police bharti physical examesakal
Updated on

सोलापूर : शहर व ग्रामीण पोलिस दलातील भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरवात झाली. शहर पोलिस दलातर्फे चालक व पोलिस शिपायांची ५० तर ग्रामीण पोलिस दलातर्फे ९४ पदांची भरती केली जात आहे.

पहिल्या दिवशी शहर पोलिसांनी ४५९ तर ग्रामीण पोलिसांनी ५०० उमेदवारांना बोलावले होते. त्यापैकी शहरातील १५९ तर ग्रामीणकडील १९४ उमेदवार गैरहजर राहिले. दुसरीकडे दोन्हीकडील ११३ उमेदवार भरतीसाठी अपात्र ठरले आहेत.

पावसाने उघडीप दिल्याने पोलिस भरतीचा पहिला दिवस यशस्वी ठरला. ग्रामीण व शहर पोलिस मुख्यालयातील मैदानावरील चिखलामुळे काही काळ त्याठिकाणी १०० मीटर धावण्याचा प्रकार विलंबाने झाला. तत्पूर्वी, गोळाफेक व १६०० मीटर धावणे हे प्रकार पार पडले.

शहर पोलिसांनी त्यांच्याकडील उमेदवारांना केगाव डेंटल कॉलेजच्या रस्त्यांवर १६०० मीटर धावायला लावले. तर ग्रामीण पोलिसांनी त्यांच्याकडील उमेदवारांचे १०० व १६०० मीटर धावणे आणि गोळाफेक हे प्रकार त्यांच्या मुख्यालयाच्या मैदानावरच घेतले.

पहिल्या दिवशी ग्रामीण पोलिसांकडील ५० तर शहर पोलिस दलाकडील १५९ उमेदवार भरतीतून बाद ठरले आहेत. बहुतेक उमेदवारांची उंची अर्धा इंच कमी पडली तर काहींची छाती थोडी कमी पडल्याचे पाहायला मिळाले. तर काही मोजके उमेदवार कागदपत्रात अपात्र ठरले.

आज १२५० उमेदवारांची मैदानी, पण...

पावसामुळे पोलिस भरतीची मैदानी चाचणी तीन ते पाच दिवसांत संपविली जाणार आहे. पाऊस पडल्यानंतर भरती पुन्हा मैदान कोरडे होईपर्यंत थांबवावी लागणार आहे. उद्या (गुरुवारी) पोलिस भरतीसाठी ग्रामीण पोलिसांनी ७५० तर शहर पोलिस दलाने ५०० उमदेवारांना मैदानी चाचणीसाठी निरोप धाडला आहे.

त्यांची गुरुवारी मैदानी चाचणी होणार आहे. दरम्यान, बुधवारी पडलेल्या पावसामुळे शहर मुख्यालयाच्या मैदानांवरील गोळाफेक व १०० मीटर धावणे हे प्रकार मैदानाची स्थिती पाहून घेतले जाणार आहेत. पण, १६०० मीटर धावण्यास डेंटल कॉलेजच्या रोडवर काहीही अडचण नाही, असे शहर पोलिसांनी स्पष्ट केले आहे. तर ग्रामीण पोलिसांनीही मैदानाची स्थिती पाहूनच निर्णय होईल, असे सांगितले आहे.

maharashtra police bharti physical exam
Maharashtra Police Recruitment: पोलिस भरतीला बुधवारी प्रारंभ! 4 दिवसांची ‘ग्रेस’; अडचणीत सापडलेल्या उमेदवारांना दिलासा

जिल्ह्याच्या पोलिस भरतीची स्थिती

(शहर पोलिस)

  • पोलिस शिपायांच्या जागा : ३४

  • चालक शिपायांच्या जागा : १६

  • एकूण उमेदवार : २,३७४

(ग्रामीण पोलिस)

  • पोलिस शिपायांच्या जागा : ८५

  • चालक शिपायांच्या जागा : ९

  • एकूण उमेदवार : ४,३५३

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.