Praniti Shinde : 'मोदी तेरा कैसा खेल, दारू सस्ती मेहंगा तेल'

गावभेट दौऱ्यात आजीबाईंनी अडविला शिंदेंचा रस्ता, अन विचारले प्रश्न
Praniti Shinde
Praniti Shindesakal
Updated on

सलगर बुद्रुक (जिल्हा सोलापूर) - आगामी सोलापूर लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे या मंगळवेढा तालुक्यातील सलगर बुद्रुक या गावात आल्या होत्या. सभा आटोपून जात असताना गर्दीतून वाट काढत सत्तरी ओलांडलेल्या गवळाबाई सवईसर्जे या महिलेने धाडस करून प्रणिती शिंदेचा रस्ता अडविला व प्यायला पाणी मिळत नाही, पण गावात दारू भरपूर मीळते, आम्हाला पाणी हवे आहे, असे सांगितल्यावर प्रणिती शिंदे यांनी त्यांना शब्द दिला व आपण निवडून आल्यावर तुमचे सगळे प्रश्न सोडवू असे आश्वासन दिले. त्यानंतर जाताना त्यांनी 'वारे मोदी तेरा खेल सस्ती दारू मेंहगा तेल' अशी घोषणा देताच उपस्थित सर्व नागरिकांमध्ये हशा पिकला.

मंगळवेढ्यातील सलगर बुद्रुक परिसरातील गावांमध्ये भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. प्यायला पाणी नाही, हाताला काम नाही, त्यामुळे या भागातील जनता व्यथित झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत सर्वपक्षीय नेते असताना सामान्य लोकांचा प्रश्न काय आहे. हे एका दलित समाजातील सत्तरी पार केलेल्या आजीला मांडावा लागतोय. हे आजच्या परिस्थितीचे वास्तव आहे.

नेत्या बरोबर स्थानिक कार्यकर्ते आपापल्या पुढाऱ्यांच्या मागे पळत आहेत. अशा कार्यकर्त्यांना त्यांच्याच भोवती निर्माण झालेल्या समस्यांची जाणीव त्यांना नाही. पण जे या निवडणुकीच्या प्रभावापासून वेगळे आहेत. आपले रोजचे हालाखीचे जीवन जगण्यात मरणयातना भोगत आहेत अश्या लोकांचे प्रतिनिधित्व कोण करणार असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे.

त्यामुळेच अडाणी, अशिक्षित पण समस्येची जाण असलेल्या एका दलित वस्तीतील सत्तरी पार केलेल्या महिलेला थेट लोकसभेच्या उमेदवाराचा रस्ता अडवून जाब विचारण्याची हिम्मत करावी लागत आहे. पण शिकल्या सवरलेल्या समाजव्यवस्थेची तोंडे का बंद आहेत हे न उमलणारे कोडे आहे.

दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर तुमच्याकडे मते मागायला पहिल्यांदाच आले आहे. काहींना वाटत आहे की मी आत्ताच का आले आहे. त्यांना हे सांगायचं आहे की दुसऱ्याच्या मतदार संघात नाक खुपसण्याचे काम मी करत नाही. त्यामुळे मी इकडे आले नाही. पण आता तुमच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याकरिता, तुमचा आवाज लोकसभेत पोहचवण्यासाठी, मी तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी तुमच्या गावी आली आहे. असे मत सोलापूर लोकसभेच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी मांडले.

त्यांचे हे वक्तव्य स्थानिक आमदार आवताडे यांना डीवचणारे होते का हे येणाऱ्या काळात पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडी तर्फे काँग्रेस पक्षाच्या उमेदवार प्रणिती शिंदे ह्या मंगळवेढ्यातील सलगर बुद्रुक, सलगर खुर्द, जंगलगी, लवंगी, आसबेवाडी, येळगी आदी गावात प्रचार दौऱ्यानिमित्त गावभेट दौऱ्यावर आल्या होत्या.

यावेळेस त्यांच्यासोबत काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रशांत साळे, काँग्रेसचे जिल्हा कार्यध्यक्ष नंदकुमार पवार, जेस्ट नेते शिवाजी कालुंगे, आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान या गावभेट दौऱ्यात उबाठा शिवसेना पक्षाचे व राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आघाडीचे नेते दिसले नाहीत. त्यामुळे महाविकास आघाडीत सर्व आलबेल आहे का असा सवाल उपस्थितांमध्ये निर्माण झाला होता.

प्रणिती शिंदे पुढे बोलताना म्हणाल्या की मंगळवेढ्यातील 24 गावच्या उपसा सिंचन योजने विषयी विधानसभेत मी आवाज उठवीला. आदरणीय सुशीलकुमार शिंदे व कै भारत भालके यांनी या पाणी प्रश्नी काम केले होते. त्यामुळे विरोधक हे आयत्या बिळात नागोबा या प्रमाणे कागदावर मंजूर झालेल्या पाणी प्रश्नाचे श्रेय घेत आहेत.

त्यामुळे विरोधकांच्या रेट्यामुळेच 24 गावची उपसा सिंचन योजना मंजूर झाली आहे. गेल्या दहा वर्षांत महागाई कमी झाली नाही. रोजगार मिळाला नाही. शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी नाही. त्यामुळे भाजप सरकारने गेल्या दहा वर्षांत खोटे बोला पण रेटून बोला या पध्द्तीने कारभार केला आहे. मी काम करणारी आमदार आहे. त्यामुळेच सोलापूर मध्य मधून सलग तीन वेळा मी आमदार आहे.

मी धर्म, जात, पात मानत नाही. त्यामुळे तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी, तुमचा या सरकारच्या विरोधातील आवाज दिल्ली दरबारी मांडण्यासाठी तुमची बहीण, लेक म्हणून मला आशीर्वाद द्यावा अशी मी तुम्हाला विनंती करण्या करीता आले आहे मत त्यांनी मांडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.