इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (इस्मा) नवी दिल्लीच्या संचालकपदी लोकमंगल शुगरचे अध्यक्ष महेश देशमुख यांची निवड झाली आहे.
उत्तर सोलापूर : इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (Indian Sugar Mills Association - ISMA) (इस्मा) नवी दिल्लीच्या संचालकपदी लोकमंगल शुगरचे (Lokmangal Sugar) अध्यक्ष महेश देशमुख (Mahesh Deshmukh) यांची निवड झाली आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत महेश देशमुख यांना सर्वाधिक मते मिळाली आहेत. देशभरात कार्यरत असलेल्या या संस्थेवर राज्यातून तीन जणांची संचालकपदी निवड करण्यात आली आहे.
महेश देशमुख हे 2009 पासून इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या संचालक पदावर कार्यरत आहेत. यंदाच्या वर्षासाठी राज्यातून निवडून द्यावयाच्या तीन जागांसाठी चार जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यामुळे मतदानाद्वारे ही निवड करण्यात आली. लोकमंगल शुगरचे महेश देशमुख यांना 99, गंगामाई इंडस्ट्रीज लिमिटेडच्या रणजित मुळे यांना 94, "इंद्रेश्वर'च्या अंकिता पाटील यांना 92 तर समय बनसोडे यांना 59 मते मिळाली आहेत. यात देशमुख यांना सर्वाधिक मते मिळाली आहेत.
इंडियन शुगर मिल्स असोसिएशन ही संस्था देशभरातील साखर उद्योगा संदर्भात काम करते. सरकारला साखर उद्योगासमोरील समस्या व उपाय या संदर्भात मार्गदर्शन करते. साखर उद्योगाविषयी आपली बाजू सरकारपुढे भक्कमपणे मांडते. अशा या संस्थेवर 2009 पासून देशमुख हे कार्यरत आहेत. त्यांच्या निवडीबद्दल कारखान्याचे संचालक पराग पाटील व प्रशांत पाटील यांनी त्यांचा सत्कार केला.
भविष्यात या संस्थेवर राज्यातील जास्तीत जास्त साखर कारखाने सदस्य बनविण्यास प्राधान्य देण्यात येईल. साखर उद्योगातील समस्या व त्यावर काय उपाययोजना करता येतील, याबाबत आमची बाजू सरकारसमोर भक्कमपणे मांडू.
- महेश देशमुख, संचालक, इंडियन शुगर मिल्स असोसिएशन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.