पालकमंत्र्यांनी बांधली कोठे, तौफिक अन्‌ चंदनशिवेंच्या ताकदीची मोट !

पालकमंत्र्यांनी बांधली कोठे, तौफिक अन्‌ चंदनशिवेंच्या ताकदीची मोट !
पालकमंत्र्यांनी बांधली कोठे, तौफिक अन्‌ चंदनशिवेंच्या ताकदीची मोट !
पालकमंत्र्यांनी बांधली कोठे, तौफिक अन्‌ चंदनशिवेंच्या ताकदीची मोट !Canva
Updated on
Summary

"जिसकी जितनी संख्या भारी, उसकी उतनी भागीदारी' या तत्त्वानुसार आगामी महापौर आमचाच, असा विश्‍वास राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्‍त केला आहे.

सोलापूर : 'जिसकी जितनी संख्या भारी, उसकी उतनी भागीदारी' या तत्त्वानुसार आगामी महापौर आमचाच, असा विश्‍वास राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (NCP) पदाधिकाऱ्यांनी व्यक्‍त केला आहे. जुन्या- नव्यांची मोट बांधून महापालिकेत सत्ता आणण्याचा प्रयत्न पालकमंत्री दत्तात्रय भरणे (Guardian Minister Dattatraya Bharne) यांनी सुरू केला आहे. महेश कोठे (Mahesh Kothe), तौफिक शेख (Toufiq Shaikh) आणि आनंद चंदनशिवे (Anand Chandanshive) यांच्या मदतीने सत्तेची समीकरणे जुळवली जात आहेत.

पालकमंत्र्यांनी बांधली कोठे, तौफिक अन्‌ चंदनशिवेंच्या ताकदीची मोट !
अंकुश शिंदे यांची मुंबईला बदली! दत्तात्रय कराळे नवे पोलिस आयुक्त

महापालिकेत 102 नगरसेवक असून सत्तेसाठी 52 नगरसेवक लागतात. महापालिकेत सध्या वंचित बहुजन विकास आघाडीचे चार, एमआयएमचे नऊ नगरसेवक आहेत. तर शिवसेनेचे माजी विरोधी पक्षनेते महेश कोठे यांचे समर्थक नगरसेवक 12 ते 14 आहेत. दुसरीकडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसची शहरात ताकद मोठी आहे. पक्षाने आगामी महापालिकेची जबाबदारी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर सोपविली आहे. त्या अनुषंगाने त्यांनी अन्य पक्षांतील नाराजांना आपलेसे करून पक्षातील नेत्यांसोबत आणण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्यात सत्तेत आल्यानंतर राष्ट्रवादीची पॉवर वाढली आहे. तेव्हापासून राष्ट्रवादीत येणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे.

पालकमंत्र्यांनी बांधली कोठे, तौफिक अन्‌ चंदनशिवेंच्या ताकदीची मोट !
पोलिस भरतीचे ठरले वेळापत्रक ! 'या' दिवशी लेखी परीक्षा

वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्‍ते आनंद चंदनशिवे, एमआयएमचे माजी जिल्हाध्यक्ष तौफिक शेख, माजी महापौर महेश कोठे यांनी मतदारसंघातील विकासकामांसाठी सर्वाधिक निधी मिळवणे आणि विधानसभेचे स्वप्न पूर्ण होईल, या हेतूने त्यांनी राष्ट्रवादीची वाट धरली आहे. तत्पूर्वी, महापालिका निवडणुकीतून त्यांची ताकद समजणार आहे. त्यानुसार त्यांना राष्ट्रवादीकडून पुढे संधी दिली जाणार आहे. कोठेंनी स्वत:ची ताकद निर्माण करत अनेकदा महापालिकेत किंगमेकरची भूमिका निभावली आहे. दुसरीकडे, तौफिक शेख व चंदनशिवे यांनीही त्यांच्या स्वबळावर ताकद वाढविली आहे. त्याचा फायदा आगामी महापालिकेत राष्ट्रवादीला होईल, असा विश्‍वास पदाधिकारी व्यक्‍त करीत आहेत. दरम्यान, पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली माजी महापौर मनोहर सपाटे, शहराध्यक्ष भारत जाधव, महेश गादेकर, जुबेर बागवान, संतोष पवार, दिलीप कोल्हे, महिला अध्यक्षा सुनीता रोटे यांच्यासह पक्षातील सर्वांना सोबत घेऊन संघटन मजबूत होत आहे. त्यामुळे निश्‍चितपणे महापालिकेत सत्ता येईल, याबद्दल शंका नाही, असा विश्‍वास पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्‍त केला.

महापालिकेवर सत्ता आमचीच

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून, आगामी महापालिका निवडणुकीत तिन्ही पक्षांना एकत्रित करून सत्ता आणण्याचा प्रयत्न आहे. परंतु, पक्षांतर्गत राजकारणात आघाडी होईल की नाही, हे आता सांगणे कठीण आहे. दुसरीकडे, कॉंग्रेसने स्वबळाचा नारा दिला असून त्यांनीही आगामी महापौर कॉंग्रेसचाच, असा दावा केला आहे. या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा महापौर होईल, असा विश्‍वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्‍त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.