मोहोळ : मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर मोहोळची बाजारपेठ गजबजली असून शिवाजी चौक ते गवत्या मारुती चौक या रस्त्याला अक्षरशः यात्रेचे स्वरूप आले आहे. चालू वर्षी देशी तीळ, खारीक या वस्तूचे वाढले आहेत. तर संक्रांती दिवशी लुटाण्या साठी लागणाऱ्या वस्तूंना ही मोठी मागणी आहे.
दोन वर्षाच्या कोरोनाच्या कालावधीत महिला वर्गाला संक्रांत साजरी करता आली नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने महिला खरेदी साठी मोठ्या संख्येने बाहेर पडल्या आहेत. मोहोळ शहर ही मुख्य बाजारपेठ असल्याने परिसरातील खेड्यातून ग्राहक खरेदीसाठी मोठ्या संख्येने येत आहेत. या सणाला तिळाला मोठे महत्त्व असते.गेल्या वर्षी देशी तीळ 160 रुपये किलो होता तोच तीळ चालू वर्षी 220 रुपये किलो आहे. खारीक 275 रुपये गेल्या वर्षी होती त्याच खारके चा दर यावर्षी 300 ते 500 रुपये किलो आहे. खोबरे, हळकुंड, बदाम, सुपारी यांचे दर स्थिर आहेत.
हा सण खास महिलांचा असल्याने प्लॅस्टिकच्या लुटण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंची दुकाने रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात थाटली आहेत. त्या वस्तू बरोबरच गाजर, ऊस, हरभरा डहाळा, आमटीची भाजी यांनाही मोठ्या प्रमाणात मागणी होती. संक्रातीला लहान मुलांना हौसेने बोरा ने न्हाऊ घालतात त्यासाठी लागणारे तिळाचे दागिने ही मोठ्या प्रमाणात विकले गेले. ग्रामीण भाग बागायत झाल्याने तिळाच्या पेरणीकडे फारसे कोणी लक्ष देत नाही.
संक्रातीला सर्वात महत्त्व असते ते मातीच्या सुगाडाला त्याला खण म्हणले जाते. चालू वर्षी आंध्र प्रदेशात इलेक्ट्रिक भट्ट्या सुरू झाल्याने त्या भागातून सुगाडांची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. हे सुगाड लाल कलरचे असून इलेक्ट्रिक कॉइल वर भाजल्यामुळे ते पक्के आहे. इथून पुढच्या काळात सर्व सुगाड हे लाल कलरची येणार असल्याचे व्यावसायीक विष्णू कुंभार यांनी सांगितले.
असे आहेत संक्रातीला लागणाऱ्या वस्तूंचे मोहोळ बाजार पेठेतील दर
वेलदोडे- 1600 ते 2200 रुपये प्रति किलो
बदाम (टरफल)- 180 ते 250 रुपये
खारीक- 275 ते 500
सुपारी- 550
हळकुंड- 140 ते 180
तीळ देशी- 220
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.