Solapur : शिक्षकांनी शाळा केली ‘हायटेक’

मुंडफणेवाडी जिल्हा परिषद शाळेचे रुपडे पालटले
Solapur : शिक्षकांनी शाळा केली ‘हायटेक’
Solapur : शिक्षकांनी शाळा केली ‘हायटेक’sakal news
Updated on

माळीनगर : मुंडफणेवाडी (ता. माळशिरस) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील रूपड पालटले आहे. जिल्हा परिषद शाळा आदर्श ठरत असल्याचे एकंदरीत चित्र आहे. इंग्लिश मीडियम शाळेतून विद्यार्थी येऊन जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेत आहेत. इंग्लिश मीडियम शाळेच्या पावलावर पाऊल ठेवत जिल्हा परिषद शाळा हायटेक होताना दिसत आहे. शाळेच्या मुख्याध्यापक व सहशिक्षकांनी शाळेचं पालटलेलं चित्र सर्वांसाठी आदर्शवत आणि प्रेरणादायी ठरतेय.

Solapur : शिक्षकांनी शाळा केली ‘हायटेक’
गुरजीत सिंगमुळे सिद्धूचा राजीनामा? पाच महत्त्वाच्या घडामोडी

गेल्या दीड वर्षापासून कोरोना परिस्थिती गंभीर झाली आहे. त्यामुळे राज्य शासनाकडून विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन शाळा बंद ठेवल्या आहेत. गेल्या दीड वर्षात अनेक शाळांची दुरवस्था झाली आहे. शाळा बंद होत्या त्या काळात माळशिरस तालुक्‍यातील मुंडफणेवाडी जिल्हा परिषद शाळेचे श्रमदानातून शिक्षकांनी व ग्रामस्थांनी शाळेचे रुपडे पालटले आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी दिलीप स्वामी यांचा स्वच्छ शाळा व सुंदर शाळा अभियान हा उपक्रम मुंडफणेवाडी शाळेत राबवण्यात आला. त्यासंदर्भात लोकसहभागातून शाळेच्या सुशोभीकरणावर भर देण्यात आला. सहयोगी शाळेची रंगरंगोटी तसेच शाळेतील विविध भिंतीवरती वेगवेगळ्या प्रकारची चित्र रेखाटण्यात आली असून सर्व भिंती बोलक्‍या करण्यात आलेल्या आहेत. शाळा डिजिटल करण्यासाठी दोन्ही शिक्षकांनी टीव्ही, संगणक, टॅबसुद्धा खरेदी केले. त्याचबरोबर शौचालय, पिण्याची पाण्याची टाकी, परसबाग, पार्किंग तसेच विद्यार्थ्यांसाठी खेळण्यासाठी लागणारे साहित्य याची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे शाळेच्या इमारती अधिकच सुंदर दिसत आहेत. आता फक्त शाळेतील विद्यार्थ्यांची प्रतीक्षा असल्याचे मुख्याध्यापक समीर लोणकर व सहशिक्षिका अर्चना वाघ यांनी दिली.

Solapur : शिक्षकांनी शाळा केली ‘हायटेक’
पंजाबमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; सिद्धूंचा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा

लोकसहभागातून एखाद्या चांगल्या कृती मार्गी लागण्याचे उत्तम उदाहरण म्हणजे मुंडफणेवाडी शाळेचे बदललेले रूप आहे. शिक्षकांची धडपड पाहून ग्रामस्थ देखील मदतीला धावून आले. एक पद, एक वृक्ष अंतर्गत जयकुमार मुंडफणे व अभिषेक मुंडफणे यांच्या मुलांच्या वाढदिवसानिमित्त शालेय परिसरात १५ हजारांची रोपे लावली. त्यात डॉ. सुधीर पोफळे, सोमनाथ सुरवसे, सुनील चव्हाण, सुरेश कोरे, महावीर वाघ, नितीन साने व सर्व पालकांच्या सामूहिक प्रयत्नामुळे शाळेचे रुपडे पालटून गेले आणि शाळा केवळ सुंदरच नव्हे तर डिजिटल झाली. यासाठी एकूण शैक्षणिक उठाव नव्वद हजार रुपये झाला. त्यापैकी दोन्ही शिक्षकांनी ६० हजार स्वतःचे घालून शाळेत वेगवेगळे उपक्रम राबविले.

- समीर लोणकर, मुख्याध्यापक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.