मंगळवेढा : मंगळवेढा येथील पोलीस स्टेशनला (mangalwedha police staion)नव्याने आलेले पोलीस निरीक्षक रणजित माने यांच्या स्वागताला मंगळवेढ्यातील नेत्याची रांग लागली असली त्यांच्याकडून भयमुक्त वातावरणाची अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे मंगळवेढा हे महाराष्ट्राला संतांची नगरी म्हणून जसे परिचित असले तरी अलीकडच्या काळामध्ये राज्यातील अनेक अवैध धंद्यामुळे परिचित झाले.राज्य सरकारने गुटख्याला बंदी घातल्यामुळे शेजारच्या कर्नाटकातून येणाऱ्या अनेक अवैध धंद्याचा मंगळवेढा महाराष्ट्राचे प्रवेशद्वार होऊ लागला अशा परिस्थितीत या ठिकाणी आतापर्यंत कार्यरत असलेल्या अनेक पोलिस अधिकाऱ्यांना याचा झटका सोसावा लागला यामध्ये अवैध व्यवसाय करणारे मात्र नामनिराळे राहिले आणि त्या अवैध व्यावसायिकाच्या नादाला लागून आर्थिक मोहमाया गोळा करण्याच्या नादात या तत्कालीन पोलिस अधिकार्यांनी आपले सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीदवाक्य सोडून दिले.परिणामी त्यांच्यावरील कारवाईमुळे तालुक्याला देखील बदनामीला सामोरे जावे लागले.(solapur crime)
दोन महिन्यापूर्वी पंढरपूर तालुक्यातील वाहनाने मंगळवेढ्यात पोलीस कर्मचाऱ्यांना चिरडले यातही मंगळवेढ्याची बदनामी झाली.वाळू आणि वाहन हे इतर तालुक्यातील होते अशा परिस्थितीत पोलिस निरिक्षक ज्योतिराम गुंजवटे यांच्यावर मरवडे प्रकरणातील गुन्हा दाखल करण्यास विलंब करण्यात आल्याचा ठपका ठेवला असला तरी त्याचे मूळ कारण चोरीच्या गुन्ह्याचा तपास लावण्यात आलेले अपयश आल्याची चर्चा आहे आ.समाधान आवताडे यांनी विधानसभेत अवैध व्यवसायिक वरून तालुक्याचा आवाज उठवला त्यांचा रोख मात्र उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यावर होता मात्र यात बळी मात्र पोलिस निरीक्षकाचा गेला अशी चर्चा यानिमित्ताने पुढे आली असली तरी नव्याने आलेल्या पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी तालुक्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याचे सूतोवाच केले असले तरी पोलिसांची कामगिरी मंगळवेढेकरासाठी कौतुकास्पद असली तरी सध्या त्यांच्याकडून सर्वसामान्य नागरिकांनी होत असलेल्या चोरट्यांवर बंदोबस्त करताना भयमुक्त वातावरणाबरोबर अवैध व्यवसाय नियंत्रणाची अपेक्षा देखील केली जात आहे.
तालुक्याबाहेर आंदोलकांनी तालुक्यात आंदोलन करण्याबाबत देखील सर्वपक्षीय निवेदन दिले वास्तविक पाहता एखादी घटना घडल्यावर आंदोलन करण्याची वेळ येऊ नये याची देखील जबाबदारी पोलिस खात्याने घेण्याची आवश्यकता आहे त्यामुळे आंदोलकांना देखील संधी मिळणार नाही याची खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे. सध्या वाढत्या लोकसंख्येच्या मानाने पोलिसांची संख्या तोकडी असली कोरोना संकटाच्या दुसऱ्या लाटेत केलेल्या कामाप्रमाणे त्यांच्याकडून देखील कमी कर्मचाऱ्यावर चांगले काम करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. ते निश्चितपणे काम पूर्ण करतील अशी अपेक्षा तालुकावासीयातून व्यक्त केली जात असली तरी अनेक राजकीय हस्तकांना मात्र त्यांना अंतरावरच ठेवावे अशी मागणी यानिमित्तानं पुढे येत आहे. तालुक्यांमध्ये विविध खात्यातील अनेक अधिकाय्रांनी उल्लेखनीय काम करून जाताना व येताना त्यांच्या कार्याबद्दल कमी सत्कार केल्याचे दिसून आले मात्र पोलीस खात्याचे अधिकाऱ्याला मात्र वर्दळ जास्त दिसून येते याची देखील या निमित्ताने चर्चा सुरू झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.