Solapur : जप्त वाहन सोडण्यासाठी 'इतक्या' हजारांची घेतली लाच; दोघांना झाली अटकेत

Mangalvedha: प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार प्रकाश विठ्ठल सगर व महसूल सहाय्यक विवेक ढेरे याला लाच लुचपत विभागाने लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले
Solapur : जप्त वाहन सोडण्यासाठी 'इतक्या' हजारांची घेतली लाच; दोघांना झाली अटकेत
Updated on

Latest Bribe News | वाळू व्यवसायात सांगोला तहसील कार्यालयाने केलेल्या कारवाईतील जप्त वाहन सोडण्यासाठी प्रांत कार्यालयातून परवानगी देण्यासाठी वीस हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती पाच हजार रुपये लाच स्वीकारताना मंगळवेढा येथील प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार प्रकाश विठ्ठल सगर व महसूल सहाय्यक विवेक ढेरे याला लाच लुचपत विभागाने लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले, येथील महसूल कार्यालय वारंवार लाचलुचपत पथकाच्या सापळ्यात अडकत चालले

या प्रकरणाची सविस्तर हकीकत अशी की, सांगोला तहसील कार्यालयाने अवैध वाळू व्यवसायावर कारवाई करत टाटा मेगा वाहन सन 2020 साली पकडले.व ते जप्त वाहनावर 1 लाख 37 हजार 684 इतका दंड आकारण्यात आला.

Solapur : जप्त वाहन सोडण्यासाठी 'इतक्या' हजारांची घेतली लाच; दोघांना झाली अटकेत
Solapur News : जि. प. शिक्षण विभाग अलर्ट;गणवेश बंधनकारक, मोबाईल वापरावर निर्बंध

सदर दंडाची रक्कम भरल्याने वाहन सोडण्याकरता प्रांत कार्यालयाची परवानगी आवश्यक होती सदरची परवानगी देण्यासाठी तक्रारदाराने प्रांत कार्यालयाशी संपर्क साधला. त्यावेळी वाहन सोडण्यासाठी 20 हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती दहा हजार रुपये निश्चित करून पाच हजाराची लाच स्वीकारण्यात आली.

सदरची लाच स्वीकारताना नायब तहसीलदार प्रकाश विश्वनाथ सगर वय 55 रा. समृद्धी नगर सोलापूर व महसूल सहाय्यक विवेक ढेरे वय 32 रा. इचलकरंजी ता. हातकलंगले जि. कोल्हापूर यास लाच स्वीकारताना रंगेहात पकडले ही कारवाई लाच लचपत विभागाचे पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक पो. ना. अतुल घाडगे, पो. ना. सलीम मुल्ला,पो. ना. स्वामीराव जाधव पो. ना. राहुल गायकवाड यांच्या पथकाने केली.

महसूल कार्यालयाकडून त्यांच्या कामासाठी आलेल्या जनतेला छळण्याचे प्रकार सुरूच असून गतवर्षी याच कार्यालयात महामार्गासाठी बाधित जमीनीचा मोबदला देण्यासाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी तलाठ्यावर कारवाई करून बडे मासे मोकळे सोडण्यात आले.

Solapur : जप्त वाहन सोडण्यासाठी 'इतक्या' हजारांची घेतली लाच; दोघांना झाली अटकेत
Solapur Bus News : बसस्थानकातील अतिक्रमणामुळे अपघाताला निमंत्रण; एसटी महामंडळाच्या चालकांसाठी ३१ प्रकारचे नियम

तर गत आठवड्यात तहसील कार्यातील मंडल अधिकाऱ्याला लाच प्रकरणात अटक करण्यात आली. ही घटना ताजी असतानाच आज प्रांत कार्यालयात थेट नायब तहसीलदार व महसूल सहायक लाच प्रकरणात लाच लुचपत विभागाच्या सापळ्यात सापडले या दोघांवर कारवाई करताना या कारवाईच्या अनुषंगाने थेट मुळाशी जाऊन यामध्ये बडे अधिकारी आहेत का याचा शोध घ्यावा अशी मागणी तालुक्यातील जनतेतून होत आहे.

कारण सध्या महसूल विभागाकडून तालुक्यातील जनतेला छळण्याची परिशिमा गाठली यामध्ये अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांच्या सहभाग आहे याकडे वरिष्ठ अधिकाऱ्याने केल्यामुळे जनतेने अखेर लाचलुचपत विभागाचा पर्याय निवडला.

Solapur : जप्त वाहन सोडण्यासाठी 'इतक्या' हजारांची घेतली लाच; दोघांना झाली अटकेत
Solapur: मोहोळ तालुक्यात शेतकऱ्याने संपवले जिवन, कारण अस्पष्ट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.