ब्रह्मपुरी (सोलापूर) : सोलापूर - कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर तीन वर्षांपासुन संथ गतीने काम चालू असून खोदलेल्या रस्त्यामुळे महामार्गावरील मंगळवेढा - ब्रह्मपुरी रस्त्यावरील पेट्रोल पंपाजवळ चार चाकी वाहन अपघातात दोन दिवसात जागीच तीन जणांचा बळी गेला. या अपघातानंतर नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट निर्माण झाली असून हा महामार्ग आणखी किती जणांचे बळी घेणार असा सवाल प्रवाशी वर्गातून केला जात आहे.(Three people were killed on the spot in two days in the accident)
सोलापूर - मंगळवेढा ह्या राष्ट्रीय महामार्गावरील अपघाताच्या मालिका चालुच असुन अनेक निष्पापांचे जीव घेणारा रस्ता हा प्रवाशांसाठी शाप ठरत आहे.राष्ट्रीय महामार्गाच्या कंपनीने गेल्या तीन वर्षांपासुन रस्ता उकरून ठेवल्याने व खोदकाम केल्याने हा महामार्ग मृत्यु महामार्ग बनला असुन अनेक जणांचे बळी या रस्त्याने घेतले. क्रेनचालक यांच्या बेफिकरिमुळे ब्रह्मपुरी येथील माजी उपसरपंच सुनील पाटील यांना जीवास मुकावे लागले. या विरोधात अनेक आंदोलने ,तक्रारी झाल्या परंतु त्या निष्फळ ठरल्याने हा मृत्यु महामार्ग आणखी कीती बळी घेणार असा सवाल केला जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय महामार्ग दामाजी कारखाना पाटी ते इंचगाव दरम्यान अपघातात रस्ता दुरुस्तीच्या कामामुळे कित्येक जणांचा बळी गेला. माचनूर- बेगमपुर येथील जुना पुलावरील असणारा अरुंद रस्ता ,खोदकाम,मोठ्या वाहनांची वर्दळ , चढ - उतार वळणे असल्यामुळे वाहन वर्गास जीव मुठीत घालून प्रवास करावा लागत आहे सततच्या अपघात मुळे हा रस्ता अत्यंत धोकादायक बनत चालला आहे. अपघातांची मालिका सुरूच असून, गेल्या दहा दिवसाच्या कालावधीत महामार्गावर अपघातात चार जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.अपघातांची ही मालिका संपता संपत नाही, अशी परिस्थिती आहे. अपघातांच्या या घटना नवीन नाहीत. मात्र, त्यावर उपाययोजनादेखील होत नाहीत.(National Highway Company has been digging and excavating the road for the last three years)
तीन वर्ष उलटूनही काम अर्धवट असल्याने महामार्गावर प्रचंड धुळीचे साम्राज्य पसरून प्रवासी व नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत.ठेकेदाराचे अनेक अवजड वाहने सुसाट वेगाने जात असून वाहन चालक यांच्या अरेरावी मुळे त्यावर कोणाचेही नियंत्रण नसल्याने जीवास धोखा होत आहे. महामार्गाच्या लगतच्या शेतीचे नुकसान होत आहे. काम सुरु असतांना रात्रीच्या वेळी दिसेल अशी रेफलिक्टर पट्टी, योग्य दिशा दर्शक फलक ,अर्धवट कामे,खांब उभे करणे आवश्यक असताना काहीही उपाय योजना करण्यात आली नाही. त्यामुळे प्रवाशी वर्गाना हा रस्ता जातो कुठेच माहिती नसणे तसेच रात्रीच्या वेळी खड्डे न दिसल्यामुळे अपघात होत आहेत. अनेक दिवसापासून आणून टाकलेली खडी व माती यामुळे अनेक वाहने थेट खोदलेल्या खड्यात पडून अपघात होत आहेत.(work is still incomplete even after three years)
"रस्त्याचे खराब काम,दिशादर्शक फलक नसणे, व अर्धवट कामे आदी पासून होणा-या अपघातास मुंबई उच्च न्यायालयाच्या निवाड्याप्रमाणे राष्ट़्रीय महामार्ग अॅथोरिटी जबाबदार असल्याने त्यांच्यावर दिवाणी व फौजदारी कारवाई व्हायला पाहीजे. "
- जनार्धन शिवशरण , माचणूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.