आंबा, डाळिंब, जांभूळ यांसारख्या फळबागांचे नुकसान झाले आहे. तर, मोठमोठे वृक्ष उन्मळून पडली आहेत.
मंगळवेढा : अवकाळी पाऊस व वादळाने तालुक्यात (Mangalvedha Crop Damage) मोठे नुकसान केले असून शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई त्वरित द्यावी, अशी मागणी (Shiv Sena) शिवसेनेकडून (उबाठा) निवेदनाद्वारे उपविभागीय अधिकारी यांच्याकडे करण्यात आली. यावेळी तालुकाध्यक्ष प्रा. येताळा भगत, शहराध्यक्ष दत्तात्रय भोसले, आबा लांडे आदी उपस्थित होते.
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की दि. 26 रोजी सायंकाळी तालुक्यातील लक्ष्मी दहिवडी, भाळवणी, निंबोणी, जालीहाळ, हाजापूर, गणेशवाडी, डोंगरगांव, कचरेवाडी, पाठखळ, खुपसंगी, खडकी, आंधळगांव, भोसे, हुन्नूर, रेवेवाडी, मानेवाडी यासह सर्वच गांवाना अतिशय तीव्र स्वरुपांच्या वाऱ्यामुळे वादळी तडाका बसला आहे. यामुळे तालुक्यातील शेतकरी व सामान्य नागरिकांच्या घरावरील पत्रे उडून गेले आहेत.
शेततळ्यातील कागद उडाले आहेत. तसेच आंबा, डाळिंब, जांभूळ यांसारख्या फळबागांचे नुकसान झाले आहे. तर, मोठमोठे वृक्ष उन्मळून पडली आहेत. संरक्षित शेतीसाठी उभारलेले शेडनेट, द्राक्षांचे शेड उडून गेले आहेत. जनावरांच्या सोयीसाठी उभारलेले पत्राशेडही उडून गेले आहेत. जोराच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी मुकी जनावरे जखमी झालेली आहेत.
जनावरांसाठी ठेवलेला कडबा सुका चारासुध्दा वाऱ्याच्या रौद्र रुपात उडून गेल्याने जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न उभा राहिला आहे. तालुक्यातील वादळी वाऱ्याने झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करुन कष्टकरी शेतकरी, सामान्य नागरिक, दूध उत्पादक व पशुपालकांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी मंगळवेढा शिवसेनेच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आलीये.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.