Mangalwedha News : मंगळवेढ्यात 8 हजार 34 किलो बियाणे 2 हजार 796 लाभार्थ्यांना वाटप

मंगळवेढ्या तालुक्याचा दुष्काळ सदृश्य यादीत समावेश झाल्याने प्रशासनाकढुन दुष्काळू उपाययोजनेच्या कामांना सुरवात झाली आहे.
Dr. Suhas Salgar
Dr. Suhas Salgarsakal
Updated on

सलगर बुद्रुक - मंगळवेढ्या तालुक्याचा दुष्काळ सदृश्य यादीत समावेश झाल्याने प्रशासनाकढुन दुष्काळू उपाययोजनेच्या कामांना सुरवात झाली आहे. मंगळवेढ्यातील दुष्काळ सदृश्य परिस्थिती लक्षात घेऊन शासकीय उपाययोजनेचा भाग असलेल्या चारा टंचाई वर मात करण्यासाठी शेतकऱ्यांना पशुवैद्यकीय विभागा मार्फत बियाणे वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला आहे.

यात 8 हजार 34 किलो बियाणाचे वाटप करण्यात आले आहे. तालुक्यातील 2 हजार 796 शेतकरी लाभार्थ्यांना याचा लाभ होणार असून तालुक्यातील 81 गावांमधील 481 हेक्टर वर या चारा वर्गीय बियाणांची लागवड होणार आहे. तसेच यातून 24 हजार 50 मेट्रिक टन चाऱ्याचे उत्पादन होणार आहे. त्यामुळे चारा टंचाईची भीती लक्षात घेऊन प्रशासनाने पावले उचलायला सुरवात केली आहे.

जियो ट्यागिंग महत्वाचे -

प्रशासनाकडून शेतकऱ्यांना चारा वर्गीय बियाणाचे वाटप होत आहे. पण शेतकऱ्यांना मिळालेल्या बियांचे लागवड करून त्या पेरणी केलेल्या क्षेत्राचे जियो ट्यागिंग करण्याच्या सूचना पशुवैद्यकीय विभागाने संबंधित शेतकऱ्यांना केल्या आहेत. ट्यागिंग केल्यामुळे प्रत्यक्ष चाऱ्याचे मोजमाप करणे सोयीचे होणार आहे. शिवाय वाटप केलेल्या बियाणांचा योग्य वापर होणार आहे.

मुरघास वाटप गरजेचे -

दुष्काळी उपाययोजनेचा भाग म्हणून जरी बियाणे वाटप होत असले तरी शेतीस पाणी नसल्यामुळे बियाणाचे वाटप करून कांहीही उपयोग होताना दिसत नाही. ज्या शेतकऱ्यांकडे पाणी नाही अश्या शेतकऱ्यांच्या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न अनुत्तरीतच राहत आहे. त्यामुळे दुष्काळ सदृश्य तालुक्यातील चारा टंचाई दूर करण्यासाठी मुरघास वाटप करण्याची दुसरी शासकीय उपाययोजना लवकर आमलात आणावी व शेतकऱ्यांना लवकरात लवकर मुरघास वाटप करावे अशी मागणी शेतकरी करत आहेत.

डॉ. सुहास सलगर,पशुवैद्यकीय अधिकारी मंगळवेढा -

तालुक्यातील 8 हजार 34 शेतकऱ्यांना चारा वर्गीय बियांचे वाटप करण्यात आले आहे. त्यातून 2 हजार 796 लाभार्थ्यांना 481 हेक्टर क्षेत्रावर पेरणी करता येणार आहे. शेतकऱ्यांणी जियो ट्यागिंग करून पेरणी केलेल्या क्षेत्राची माहिती कळवावी. अजूनही बियाणांची मागणी केली आहे. मागणी केलेल्या बियांची पूर्तता झाल्यास शेतकऱ्यांना वाटप करण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.