मंगळवेढा - बहुचर्चित मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या संदर्भातील प्रश्न संसदेत तब्बल दहा वर्षानंतर खा. प्रणिती शिंदे यांनी उपस्थित केला. मात्र प्रत्यक्षात ही योजना कधी सुरू होणार, असा प्रश्न या भागातील जनतेमधून विचारला जात आहे.
2009 च्या लोकसभा निवडणुकीवर 22 गावांनी बहिष्कार टाकल्यानंतर या भागातील शेतीचा व पिण्याचा पाण्याचा प्रश्न अधिक चर्चेत आला. त्यानंतर तत्कालीन आ. स्व. भारत भालके यांनी यासंदर्भात पाठपुरावा करत 2014 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून या योजनेस प्रशासकीय मान्यता मिळवली.
मात्र राज्यात व देशात सत्ता बदल झाल्याने या योजनेचे चित्र बदलले 2014 साली खा. झालेल्या शरद बनसोडे यांनी लोकसभेत पहिल्यांदाच या गावाच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित केला मात्र त्यानंतर या योजनेच्या संदर्भात केंद्रस्तरावरून कोणताही पाठपुरावा अगर हालचाल झाली नाही तो प्रश्न राज्य पातळीवरच घुटमळत राहिला.
त्यामध्ये प्रस्तावातील त्रुटी, फेर सर्वेक्षण, पाणी उपलब्धता प्रमाणपत्र, सुधारित मान्यता, डी पी आर, अशा वेगवेगळ्या मुद्द्यावरून हा प्रस्ताव राज्य पातळीवर सरकत राहिला, तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राच्या निधीतून या योजनेचा प्रश्न मार्गी लावतो असा शब्द दिला होता मात्र त्याची पूर्ती झाली नाही.
परंतु आ.समाधान आवताडे यांनी या योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळवण्यास मात्र बाजी मारली यापूर्वीचे खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी पाणी प्रश्नाकडे ढुंकून देखील बघितले नाही. त्यामुळे त्याचा फटका सत्ताधारी पक्षाला नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बसला.मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपून आता विधानसभेची आचारसंहिता लागू होण्याची वेळ आली.
मात्र या योजनेसाठी भरीव निधीची तरतूद अथवा प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली नसल्यामुळे या भागातील नागरिकाकडून विचारणा होत असतानाच आज या भागातील नवनिर्वाचित खा. प्रणिती शिंदे यांनी या गावच्या पाण्यावरून पुन्हा लोकसभेत प्रश्न उपस्थित केला त्यामुळे यापूर्वी दहा वर्षांपूर्वी उपस्थित केलेला प्रश्न त्यानंतर आज उपस्थित झाला प्रश्न यावरून केंद्र सरकार तर या योजनेबद्दल गांभीर्याने घेणार का असा सवाल या निमित्ताने विचारला जात आहे.
खा. प्रणिती शिंदे ह्या आक्रमक असून एखादा प्रश्न हातात घेतला तर तो पूर्ण होईपर्यंत त्याचा पाठलाग करतात. आरक्षण आणि पाण्याचा प्रश्न पहिला लोकसभेत मांडणार या शब्दाची पुर्ती केली त्यामुळे त्याच या भागाचा प्रश्न सोडणार आहेत.
- अॅड. रविकिरण कोळेकर, तालुकाध्यक्ष युवक काँग्रेस
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.