मंगळवेढा : एखादा इंजिनियर चुकला तर पूर्ण इमारत बाद होते,डाॅक्टर चुकला तर पेशंट मात्र शिक्षक चुकला तर पूर्ण पिढ्यान पिढ्याच्या आयुष्याचे करिअर बाद होते म्हणून शिक्षक हा सध्या समाज सुधारकामधील महत्त्वाचा घटक असल्याचे गौरवोद्गार आ. समाधान आवताडे यांनी व्यक्त केले. मंगळवेढा पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण प्रसंगी ते बोलत होते.
व्यासपीठावर जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रदीप खांडेकर,प्रा.येताळा भगत,दत्तात्रय जमदाडे,प्र.गटशिक्षणाधिकारी पोपट लवटे, विस्तार अधिकारी बिबिषण रणदिवे,मल्लिकार्जुन आनंदपुरे,ह.भ.प.नवनाथ मोरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. तालुक्यातील विविध शाळेत कार्यरत असलेल्या 34 शिक्षकांना यावेळी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी बोलताना आ. अवताडे म्हणाले ,की तालुक्याचा राजकारण समाजकारण अर्थकारण घडवण्यामध्ये शिक्षकांचे योगदान मोठ्या ठरले आहे.
तालुक्यातील शिक्षकांमुळे तालुक्यातील शिक्षणाचा दर्जा अलीकडच्या काळात चांगला वाढला आणि विद्यार्थी शिष्यवृत्ती यादीत चमकू लागले आहेत सध्या शिक्षकांना अशैक्षणिक कामे,शिक्षकांची रिक्त पदे, जुनी पेन्शन योजना, मुख्यालयात राहण्याचा प्रश्न वेतन आयोगातील त्रुटी, यासह अनेक प्रश्न शिक्षकांचे आहेत तरी देखील या सर्व गोष्टी बाजूला ठेवून शिक्षक ज्ञानदानाचे काम मोठ्या हिमतीने करीत आहेत मी या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून या शिक्षकांच्या प्रश्नासाठी एक पाऊल पुढे राहून विधानसभेत आवाज उठवून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करेल असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.प्रास्ताविक प्र.गटशिक्षणाधिकरी पोपट लवटे यांनी केले. सुत्रसंचालन दिगंबर तोडकरी यांनो केले आभार बिबिषण रणदिवे यांनी मानले.
हे ठरले आदर्श शिक्षक पुरस्काराचे मानकरी
रुक्मिणी शेटे, शिवाजी मुढे,प्रगती गायकवाड, रघुनाथ हजारे, दत्तात्रय बोबलादे, उषाताई जामगाॅड,दत्तात्रय सलगर,दगडू सर्जे,अरुण सरडे, उध्दव इंगळे,अरुंधी पोरे,रेश्मा मेटकरी,रंगनाथ पाटील,पार्वती मठपती,भारत नागणे,इनतभाई मुलाणी,सिध्दाप्पा कोळी (दिव्यांग), कांताराम बाबर, गंगाराम चव्हाण, सिध्देश्वर करपट्टी,अनिल पाटील, ज्ञानेश्वर घोडके, विजय झिजुरटे, राजश्री बुगडे, दिगंबर कुचेकर, मीनाक्षी फुगारे, अशोक मासाळ, रमेश बनसोडे,राजशेखर कोष्टी,चंद्रकांत डांगे,पुरुषोत्तम राठोड, संगिता मोरे, शरदचंद्र पवार, अतुल रामदासी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.