Manoj Jarange: पहाटे ४ वाजता कडाक्याच्या थंडीत मनोज जरांगेंनी घेतली सभा; बोलताना म्हणाले 'तुमचे ऋण...'

करमाळ्यातील वांगी इथे मनोज जरांगेंची पहाटे चार वाजता सभा
Manoj Jarange
Manoj Jarangeesakal
Updated on

आज पहाटे चार वाजता करमाळा तालुक्यातील वांगी येथे मनोज जरांगे यांची सभा पार पडली आहे. काल (बुधवारी) संध्याकाळी ७ वाजता होणाऱ्या सभेला पोहोचण्यासाठी जरांगे यांना पहाटेचे चार वाजले. तरी देखील थंडीमध्ये कुडकुडत हजारोंच्या संख्येने मराठा बांधवांनी हजेरी लावली.

मनोज जरांगे यांच्या सभेसाठा काल दुपारपासून मराठा समाज हजारोंच्या संख्येने जमायला सुरूवात झाली होती. अनेक भागातून मराठा बांधव जमायला सुरूवात झाली होती. करमाळा येथील वांगी हे गाव उजनीच्या बॅक वॉटर वरती आहे. कडाक्याची थंडी या भागामध्ये जाणवते. इंदापुर येथील लोकही या सभेसाठी पोहोचले होते. सभेसाठी लाखाच्या आसपास लोक जमले होते. मात्र, जरांगे यांना पोहोचण्यासाठी उशीर झाला. ते पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास पोहोचले.

Manoj Jarange
Zika Virus: चिंता वाढली! महाराष्ट्रात आढळले झिकाचे ५ रुग्ण; काळजी घेण्याचे आवाहन

त्यांना पोहोचायला उशीर झाला मात्र, येथे जमलेल्यांनी मनोज जरांगे यांचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं. त्यानंतर ४ वाजता सभा पार पडली. ४ ते ५ मिनीटे ते सभेत बोलले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं की, मराठा समाजाला आरक्षण मिळेल, तेव्हा ही करमाळ्याची सभा कायम लक्षात राहिलं. तुमचं जे प्रेम आहे, ऋण आहे ते हा मराठा समाज कधीही विसरणार नाही, असंही ते म्हणाले आहेत.

जरांगे-पाटील यांच्या उद्या सांगली जिल्ह्यात तीन सभा

मराठा आरक्षणप्रश्नी राज्याचे लक्ष वेधून घेणारे मनोज जरांगे-पाटील शुक्रवारी (ता. १७) सांगली जिल्ह्यात तीन सभा घेणार आहेत. मराठवाड्यात त्यांच्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. आता त्यांचा पश्‍चिम महाराष्ट्राचा दौरा सुरू होत आहे. त्यांच्या दौऱ्याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. त्यांनी राज्य सरकारला दुसऱ्यांदा मुदतवाढ देताना २४ डिसेंबरपर्यत राज्य सरकारला निर्णयासाठी मुदत दिली आहे. मनोज जरांगे-पाटील यांचा हा तिसऱ्या टप्प्यातील दौरा आहे.

Manoj Jarange
Amravati News : २६ नोव्हेंबरला मुख्यमंत्री अमरावतीत; सायन्सकोर मैदानात ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम

शुक्रवारी ते खानापूर तालुक्यातील मायणीमार्गे प्रवेश करतील. सकाळी साडेआठला विटा येथे पहिली सभा होईल. त्यानंतर नियोजित वेळेनुसार त्यांचे सकाळी ११ वाजता सांगली शहरात आगमन होईल. सांगली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून शहरातील मध्यवर्ती तरुण भारत मैदानावर सभा होईल. त्यानंतर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन कोल्हापूरकडे रवाना होतील. संध्याकाळच्या सत्रात इस्लामपूर येथे सभा करून ते कऱ्हाडला रवाना होतील.

जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाने गेले दोन अडीच महिने सतत पाठपुरावा सुरू ठेवला आहे. अंतरवाली सराटी येथील पोलिस मारहाणीच्या निषेधार्थ सांगलीत १७ सप्टेंबरला जिल्हाव्यापी मोर्चा काढण्यात आला होता. आता जरांगे-पाटील यांची जाहीर सभा होणार आहे.

Manoj Jarange
Blue whale: गणपतीपुळे समुद्रकिनारी आलेल्या देवमाशाच्या पिल्लाचा अखेर मृत्यू, ऑपरेशन ब्लू व्हेल अपयशी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.