Scuba Diving : सोलापूरची मानसी डोळे ठरली सर्वात तरुण इन्स्ट्रक्टर; लवकरच थायलंडमध्ये मिळणार संधी

स्कूबा डायव्हिंगमध्ये करिअर करणारी सोलापूरची कन्या मानसी डोळे ही देशातील सर्वात स्कूबा डायव्हिंग इन्स्ट्रक्टर ठरली आहे.
Mansi Dole scuba diving
Mansi Dole scuba divingsakal
Updated on

सोलापूर - स्कूबा डायव्हिंगमध्ये करिअर करणारी सोलापूरची कन्या मानसी डोळे ही देशातील सर्वात स्कूबा डायव्हिंग इन्स्ट्रक्टर ठरली आहे. स्कूबा स्कूल इंटरनॅशनलने (एसएसआय) या संदर्भातील माहिती दिली आहे. अंदामानच्या नील बेटावर करिअरची सुरवात केलेल्या मानसीने हे यश मिळविले आहे. इन्स्ट्रक्टर ट्रेनर जयदीप कुडलकर यांच्या मार्गदर्शनाखाली तिने स्कूबा डायव्हिंगमधील हे प्रशिक्षण पूर्ण केले आहे.

पावसाळ्यामुळे डायव्हिंगचा सध्या ऑफ सिझन असल्याने मानसी सोलापुरला आली होती. त्यावेळी तिने ‘सकाळ’शी संवाद साधला. मानसी डोळे म्हणाली, स्कूबा डायव्हिंगमध्ये कअिरच्या प्रचंड संधी आहेत. कधी-कधी आपण आई, वडील, मित्र-मैत्रीण यांच्यामुळे करिअर निवडतो. त्यात आपल्या यश मिळत नाही.

मुला-मुलींनी निवडलेल्या करिअरमध्ये त्यांना अपयश आले तर वेळीच करिअर बदलण्यास काहीच हरकत नाही. सध्या मी अंदमान येथे इन्ट्रक्टर म्हणून काम करत आहे. पुढील काही दिवस गोव्यामध्ये व त्यानंतर थायलंडमध्ये काम करणार आहे.

मी सीए करावे असा घरातील सर्वांचा ओढा सीए करण्याकडे होता. ई मिल्ट्री कॅन्टीनमध्ये तर वडील ट्रेझरीमध्ये लेखा अधिकारी त्यामुळे घरातून मुलींने सीए व्हावे ही त्यांची अपेक्षा होती. मात्र मला सतत साहसी क्षेत्राची ओढ होती. रुटीन वर्कमध्ये तिचे समाधान नव्हते. पोहण्याची आवड होती, त्यातून या क्षेत्रातील करिअरची निवड केल्याचे मानसी हिने सांगितले.

स्कूबा डायव्हिंगमध्ये ट्राय स्कूबा, ॲडव्हान्स ओपन वॉटर, रेस्क्यू डायव्हिंग, डाईव्ह मास्टर, टेक्निकल डायव्हिंग असे विविध कोर्स असल्याचेही तिने सांगितले. स्कूबा डायव्हिंगसाठी लक्षद्विप, अंदमान पाँडेचरी या ठिकाणी चांगल्या साइट असल्याचेही तिने सांगितले.

सोलापूरसाठी काम करायला आवडेल

उजनीच्या पर्यटन आराखड्यातून उजनी जलाशायात स्कूबा डायव्हिंगसह इतर वॉटर स्पोर्ट सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. या माध्यमातून उजनी परिसरातील स्थानिकांना रोजगार दिला जाणार आहे. उजनी जलाशयात स्कूबा डायव्हिंग, स्कूबा डायव्हिंगचे इन्स्ट्रक्टर तयार करण्यासाठी काम करण्यास आपल्याला आवडेल अशी माहितीही मानसी डोळे हिने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.