सांगोला (सोलापूर) : कोरोनाच्या महामारीमुळे सगळीकडेच व्यायाम करण्याचा ओढा वाढला आहे. व्यायामासाठी सध्या सायकलींगच्या क्रेझमध्ये मोठी वाढ झाली आहे. शहर व ग्रामीण भागातील रस्त्यांवर व्यायामासाठी अनेकजण सायकलवर फिरताना दिसतात. यामुळे सायकलींग करणाऱ्याकडे पाहत नागरिक 'जुनं ते सोनं' तेच खर असेच म्हणत आहेत. या सायकलींगच्या वाढत्या क्रेझमुळे सायकल विक्रीमध्ये महामारी संसर्गामुळे दुप्पट वाढ झाली आहे.
कोरोना रोगाच्या संसर्गामुळे संपूर्ण जगात या रोगाचे सावट निर्माण झाले. कोरोनामुळे अनेक देशात लॉकडाउन करण्यात आला. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले. सध्या हळूहळू कोरोनाच्या संसर्गाची सात कमी होत असली तरी या रोगामुळे नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. आपले शरीर या रोगापासून बचाव करण्यासाठी सध्या अनेक जण व्यायाम करण्याचा कल नागरिकांमध्ये वाढू लागला आहे.
दररोज सकाळी-सकाळी चालणाऱ्या बरोबरच सध्या अनेक जण व्यायामासाठी सायकलींग करतानाही दिसू लागले आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागातील नागरिक रस्त्यावरती पहाटेपासून सायकलींग करताना दिसतात. सायकलींग बरोबरच नागरिकांमध्ये योगा, प्राणायामचेही धडे अनेकजण गिरवू लागल्याचे चित्र दिसत आहे.
कोरोनाच्या महामारीमुळे एकीकडे देशाची अर्थव्यवस्था ठप्प झाली असली तरी सध्या अनेक जण व्यायामाकडे मात्र वळू लागल्याचे चित्र सध्या दिसत आहे. व्यायामासाठी सायकलींग करण्याची क्रेझ वाढू लागल्याने सध्या सायकल विक्रीमध्ये ही वाढ झाली असल्याचे सायकल विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे.
सायकलींगबरोबरच योगा, प्राणायाम करण्याकडे ओढा
सध्या अनेकजण व्यायामासाठी चालणे, जिम्सला जाणे, सायकलींग बरोबरच योगा-प्राणायाम करीत आहे. नागरिक एकमेकांच्या बरोबरीने तर काहीजण सोशल मीडियाद्वारे योगा प्राणायामचे धडे गिरवू लागले आहेत.
या अगोदर अनेकांना सायकल चालवणे कमीपणाचे वाटत होते. सायकलपेक्षा मोटारसायकलला जास्त पसंती होती. परंतु सध्या व्यायामासाठी सायकल चालवणे गरजेचे असून सध्या नागरिकांमध्ये विशेषतः तरुणांमध्ये सायकलींगची क्रेझ वाढू लागली आहे
- नीलकंठ शिंदे, सायकल चालक, सांगोला.सध्या सायकलची मागणीत फार मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सायकलची मागणी वाढल्याने सर्वांना पुरवठा करणे कठीण झाले आहे. स्पोर्टस सायकलला मोठी मागणी वाढली आहे. कोरोनानंतरच्या काळात विविध प्रकारच्या सायकलींची दुपटीपेक्षा जास्त मागणीत वाढ झाली आहे.
- सर्फराज खतीब, सायकल वितरक सोलापूर जिल्हा.
संपादन - सुस्मिता वडतिले
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.