Maratha Reservation: आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक; आमदार सुभाष देशमुखांची राजीनामा देण्याची तयारी

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सुरवातीला मौन बाळगून असलेल्या सर्वच राजकीय नेत्यांनी आता व्यक्त होण्यास सुरूवात झाली आहे.
Maratha Reservation
Maratha ReservationEsakal
Updated on

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सुरवातीला मौन बाळगून असलेल्या सर्वच राजकीय नेत्यांनी आता व्यक्त होण्यास प्रारंभ केला आहे. आमदार सुभाष देशमुख यांच्या घरासमोर ठिय्या मारलेल्या आंदोलकांना त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आपला राजीनामा देण्याचीही तयारी असल्याचे मत व्यक्त केले. दरम्यान, सरकारने शब्द दिला असल्यास तो पाळावा, अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिली आहे.

आमदार सुभाष देशमुख व रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून मराठा आरक्षणासाठी एक दिवशीय अधिवेशन बोलविण्याची मागणी केली आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मागील सात दिवसांपासून आंदोलन सुरू आहे.

Maratha Reservation
Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी आणखी एका दिव्यांग तरुणाची आत्महत्या; घटनेने परिसरात खळबळ

ठिकठिकाणी राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. रविवारी रात्री व सोमवारी दुपारी आमदार सुभाष देशमुख यांच्या घरासमोर आंदोलकांनी ठिय्या दिला. या पार्श्वभूमीवर आमदार सुभाष देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून मनोज जरांगे-पाटील यांचे उपोषण सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती केली आहे. एकदिवसीय अधिवेशन बोलावून हा प्रश्न निकाली काढावा अशी विनंती मराठा समाजाचा एक घटक म्हणून करत आहे, असे आमदार देशमुख यांनी या पत्रात नमूद केले आहे.

Maratha Reservation
Maratha Reservation साठी कोकणातून पहिला राजीनामा; काँग्रेसच्या 'या' नेत्यानं पक्षाला दिली सोडचिठ्ठी

राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात सरकारने आश्वासन दिले आहे. मनोज जरांगे- पाटील यांनी त्या प्रश्नावर उपोषण केले त्यावेळी सरकारच्या प्रतिनिधीने त्यांना आरक्षण देण्यासंदर्भात आश्वासन दिले होते. बोलणी झाल्याप्रमाणे आता सरकारने आश्वासनांची पूर्तता करावी.

- सुशीलकुमार शिंदे माजी केंद्रीय गृहमंत्री .

मराठा समाजाला आरक्षणाची नितांत गरज आहे. राज्यभर आंदोलनाचा जोर वाढत आहे. मराठा समाजाला त्वरित आरक्षण देण्यात यावे. मी स्वत: मराठा समाजाच्या पाठिशी आहे. मराठा आरक्षणासाठी माझ्या पदाचा राजीनामा देण्यासही तयार आहे.

- सुभाष देशमुख, आमदार

Maratha Reservation
Kunbi Caste Certificate: कुणबी जात प्रमाणपत्र काढण्यासाठी प्रक्रिया काय? 'असे' तपासा पुरावे...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.