सोलापूर : शहरातील अनेक फुटपाथ विविध प्रकारच्या विक्रेत्यांनी व्यापले आहेत. रस्त्याच्या कडेला असलेल्या केबीन, खोकी हटविणाऱ्या महापालिका प्रशासनाने या विक्रेत्यांचे अतिक्रमण दिसत नसल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. सोलापूर महापालिका प्रशासनाने आणि अतिक्रमण विभागाने शहरात विविध ठिकाणी अतिक्रमण विरोधी कारवाई मागील काही महिन्यात केली. मात्र, अतिक्रमण विरोधी कारवाई संपताच पुन्हा व्यापारी वर्गाने आपले बस्तान आहे त्या ठिकाणी बसविले. त्यामुळे पादचाऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या वाहनधारकांच्या रांगा लागलेल्या असतात. त्यावर पदपथ तयार केले आहे. मुळात पदपथ अतिशय चुकीच्या पद्धतीने केले आहेत. बऱ्याच ठिकाणी पदपथ खालीवर असल्याने नागरिकांना चालताना याचा त्रास होतो. सहसा कोणी नागरिक फुटपाथवरून चालण्याचा प्रयत्न करीत नाहीत. पदपथचा वापर होत नसल्याचे लक्षात येताच अनेक ठिकाणी विक्रेत्यांनी त्याचा वापर व्यवसायासाठी सुरू केला आहे. काही महिन्यांपूर्वी फळविक्रेते या फूटपाथचा वापर करीत होते. परंतु अलीकडे सर्वत्र अतिक्रमण झाले आहे.
महापालिका अधिकाऱ्यांकडून दुजाभाव
विक्रेत्यांनी फुटपाथवर व्यापल्याने ग्राहक खरेदीसाठी थांबतात. त्यावेळी आपली वाहने रस्त्यावर लावतात. त्यामुळे त्या-त्या भागात वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. तिकडे शहरात खोकी, केबिन, हातगाड्या काढायच्या आणि दुसरीकडे अशा विक्रेत्यांना मान्यता द्यायची हा पालिका अधिकाऱ्यांच्या दुजाभाव लक्षात येत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. फुटपाथ विक्रेत्यांसाठी तयार केले आहेत का? याचे उत्तर प्रशासन देणार आहे का? अशी विचारणा देखील सर्वसामान्य व्यक्ती आणि इतर व्यापाऱ्यांकडून केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.