Marriage App Fraud : लग्नाळू तरुणांनो सावधान! ॲपच्या माध्यमातून खोट्या नवऱ्या तयार करून होत आहे फसवणूक, काय आहे प्रकरण ?

विवाह इच्छुक तरुणांची ऑनलाइन ॲपमधून आर्थिक तसेच मानसिक फसवणूक होण्याचे प्रमाण ग्रामीण भागात वाढले आहे.
marriage
marriagesakal
Updated on

उ. सोलापूर - विवाह इच्छुक तरुणांची ऑनलाइन ॲपमधून आर्थिक तसेच मानसिक फसवणूक होण्याचे प्रमाण ग्रामीण भागात वाढले आहे. वधूंची खोटी परिचय पत्रे पाठवून पैसे उकळले जात आहेत. मात्र फसवणूक झाली हे लक्षात आल्यानंतर जनलज्जेमुळे भीतीने अन्यायग्रस्त मुले व पालक पोटाला चिमटा घेऊन गप्प बसत आहेत.

उपवर मुलींची संख्या कमी झाल्यामुळे मुलांच्या विवाहांचा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करत आहे. या प्रश्नाचे भांडवल करून यातून आर्थिक लाभ मिळवण्याचे षड्यंत्र काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या टोळक्यांनी सुरू केले आहेत. काही तथाकथित वधू वर सूचक मंडळाकडून फसवणुकीचे प्रकार यापूर्वी उघड झाले आहेत.

त्याचबरोबर खोट्या नवऱ्या तयार करून विवाह इच्छुक तरुणांच्या कुटुंबाची आर्थिक लूट केल्याचे प्रकार गेल्या काही दिवसांत सातत्याने समोर येत आहेत. या प्रकारात काही एजंट विवाह इच्छुक तरुणांना व त्यांच्या कुटुंबांना आपल्या जाळ्यात ओढतात. एखादी व्यावसायिक नवरी लग्नासाठी उभी करून तिच्या माध्यमातून दागदागिन्यांसह रोख पैशांची लूट करतात. या प्रकरणात पोलिसांनी कित्येक टोळ्या ताब्यात घेतल्या आहेत.

अशा लोकांनी आता नागरिकांची लुबाडणूक करण्यासाठी नवे तंत्र अवलंबले आहे. समाज माध्यमातून विवाह इच्छुक तरुणांना संपर्क साधून त्यांना व्हाट्सअप वर मुलींची खोटी परिचय पत्र पाठवले जाते. याच्या माध्यमातून त्यांच्याकडून नोंदणी फीच्या स्वरूपात पैसे उकळले जातात.

मात्र कालांतराने हे सर्व खोटे असल्याचे विवाह इच्छुक तरुण व त्यांच्या कुटुंबाच्या लक्षात येते मात्र तोपर्यंत त्यांची आर्थिक लुबाडणूक झालेली असते. मात्र आपली फसवणूक झाली हे कळून सुद्धा जनलज्जेमुळे भीतीमुळे अशा प्रकरणांची पोलिसात तक्रार दिली जात नाही. अशा प्रकरणातून विवाह इच्छुक तरुणांची आर्थिक तसेच मानसिक घुसमट होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com