Dhangar Reservation
Dhangar Reservationsakal

Dhangar Reservation: धनगर आरक्षणप्रश्नी ‘सह्याद्री’वर आज बैठक; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतली उपोषणकर्त्यांची भेट

Published on

Latest Maharashtra News: धनगर समाजाच्या आरक्षणप्रश्नी रविवारी (ता. १५) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये सह्याद्री अतिथिगृहावर समाजाच्या शिष्टमंडळाबरोबर बैठक होणार आहे. सरकार नेहमीच धनगर समाजाच्या पाठीशी राहिले आहे.

‘धनगर’ आणि ‘धनगड’ ठरविण्याचा अधिकार हा आदिवासी आयोगाला आहे. तरीही मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत नक्कीच तोडगा निघेल.

धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी सकल धनगर समाजाच्या वतीने येथील टिळक स्मारक मैदानावर गेल्या सहा दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू आहे. उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावत चालली आहे.

Loading content, please wait...