जिल्ह्यात दररोज अठरा लाख लिटर गाईच्या दुधाचे संकलन होते. मात्र, पश्चिम महाराष्ट्रातील इतर जिल्ह्याच्या तुलनेने जिल्ह्यातील दुधाला तीन रुपये प्रतिलिटर इतका कमी दर मिळतो. याचे कारण इतकेच आहे की जिल्ह्यातील दुधातील सहकार लयाला गेला असून, उत्पादक पुणे जिल्ह्यातील खासगी संस्थांच्या मगरमिठीत सापडला आहे. येणाऱ्या काळात दुधातील सहकार परत जिवंत केल्यास उत्पादकाची लूट थांबणार आहे.