सलगर बुद्रुक - राज्य शासनाने 11 जानेवारी ते 10 फेब्रुवारी या एका महिन्याच्या कालावधीकरिता दुधाला प्रतिलीटर 5 रुपयांचे अनुदान जाहीर केले होते. पण अनुदान वाटपाचा कालावधी संपून गेला तरी दूध उत्पादक शेतकरी अजूनही अनुदानापासून वंचित आहेत. त्यामुळे अनुदान कधी मिळणार ता विवंचनेत दूध उत्पादक शेतकरी आहेत.
कालावधी संपला पुढे काय -
राज्य शासनाने जाहीर केलेल्या दूध अनुदान वाटपाचा एक महिन्याचा कालावधी संपला असून 11 फेब्रुवारी पासून परत गाईचा दर 3.5 फॅटसाठी 27 रुपये झाला आहे. कांही संस्थांनी दुधाचा दर 26 रुपया पर्यंत खाली आणला आहे. त्यामुळे दूध अनुदान वाटप शेतकऱ्यांसाठी मृगजळ ठरले आहे.अजून कुठल्याच दूध संघाने शेतकऱ्यांना प्रति पाच रुपयांचे अनुदान दिले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे दूध प्रश्न जैसे थे निर्माण झाला आहे.
अनुदान कालावधी वाढवा -
जाहीर केलेले अनुदान लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करा शिवाय दुधाला नैसर्गिकरित्या दूध दरात वाढ मिळत नाही तो पर्यंत दूध अनुदान वाटपाचा कालावधी वाढवा अशी मागणी शेतकरी करत आहेत. आधीच वैरण आणि पशुखाद्यावरील खर्चात मोठी वाढ झाली असल्याने दूध धंदा शेतकऱ्यांना परवडत नाही. त्यामुळे अनुदान कालावधी वाढविल्याशिवाय शेतकऱ्यांचे दूध धंद्यातले आर्थिक गणित जुळत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणने आहे.
म्हैशीच्या दुध दरात घसरण -
गाईच्या दूध दराचा प्रश्न मिटला नसताना म्हैस दूध दरात 1 फेब्रुवारीपासून 1 रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे म्हैशीच्या दूध दराचा प्रश्न निर्माण झाला आहे. एन उन्हाळ्यात दुधाचे दर कमी होत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत.
१) सागर धायगोंडे, दूध उत्पादक शेतकरी सलगर बुद्रुक - शासनाने जाहीर केलेले दूध अनुदान अजून मिळाले नाही. दूध अनुदान वाटपाचा कालावधी संपल्याने 25 ते 26 रुपयाने दूध दर मिळत आहे. त्यामुळे मायबाप सरकारने लवकरात लवकर दूध अनुदान जमा करावे व दुध अनुदान वाटपाचा कालावधी वाढवावा.
2) विजयकुमार गलांडे, दूध संकलन अधीकारी वारणा दूध संघ जत शाखा - दूध अनुदान वाटपाचा कालावधी संपला आहे.नव्याने अनुदान वाटपाचा कालावधी वाढवायला हवा असे दूध संस्थांचे मत आहे. शासनाकढुन आमच्या संघाला दूध अनुदान केंव्हा मिळणार आहे किंवा अनुदान वाटप कालावधी वाढेल का? या बाबत कोणत्याही सुचना आल्या नाहीत.
3) संतोष पवार, जिल्हा युवक अध्यक्ष प्रहार शेतकरी संघटना सोलापूर - राज्य शासनाने जोपर्यंत दुधाला नैसर्गिक रित्या दर मिळत नाहीत तोपर्यंत दूध अनुदान वाटपाचा कालावधी वाढवायला हवा. शिवाय जाहीर केलेले अनुदान लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात वर्ग करा. नाहीतर प्रहार संघटनेच्या वतीने आंदोलन पुकारले जाईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.