Solapur Politics : 'खासदार ओवैसींच्या नेतृत्वात महापालिका, विधानसभा निवडणुकीत MIM किंगमेकर ठरणार'

'मुस्लिम समाजातील व्यक्तींची जास्तीत जास्त मतदार नोंदणी केल्यास २०२४ मध्ये शाब्दींच्या रूपाने एमआयएमला मिळणार नवा आमदार'
Asaduddin Owaisi Political News
Asaduddin Owaisi Political News esakal
Updated on
Summary

'सोलापूर शहर माध्यमधून एमआयएमचा आमदार होऊ शकतो. दरवेळी उमेदवार बदलण्याचा फटका आपल्याला बसला.'

Solapur Politics : कोणी कोठेही गेले तरीही सोलापुरातील जनतेचे एमआयएमवर असलेले प्रेम कमी झालेले नाही. मागील महापालिका निवडणुकीत एमआयएमचे (MIM) नऊ नगरसेवक विजयी झाले. २०१९ ची आमदारकी थोडक्यात हुकली, असे स्पष्ट मत फारुख शाब्दी यांनी व्यक्त केले.

मला आमदार करण्यापूर्वी तुम्ही नगरसेवक व्हा, त्यासाठी जनतेत मिसळा व आपली बूथ यंत्रणा अधिक भक्कम करा, महापालिका निवडणुकीत आणि विधानसभा निवडणुकीत एमआयएमचा झेंडा नक्कीच फडकेल, असा विश्‍वासही एमआयएमचे शहराध्यक्ष फारुख शाब्दी यांनी व्यक्त केला.

Asaduddin Owaisi Political News
बारा फूट ओढ्यात कार कोसळून दोन मित्र ठार; क्षणार्धात दोन्ही कुटुंबांच्या स्वप्नांचा चुराडा, लहान बहिणीचा आक्रोश मन हेलावणार

एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात शाब्दी बोलत होते. राजा बागवान यांनी एमआयएममध्ये प्रवेश केला. त्यांच्या या प्रवेशाबद्दल शहराध्यक्ष शाब्दी यांनी त्यांचा सत्कार केला. या वेळी माजी नगरसेवक गाजी जहागीरदार, नसीम खलिफा, अझहर हुंडेकरी, वाहेदा भंडाले, कोमारो सय्यद, शकील शेख, सरफराज शेख यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Asaduddin Owaisi Political News
डॉ. आंबेडकर कमान वादावर तोडगा निघणार? चौकशी समितीनं बेडगकरांचं ऐकून घेतलं म्हणणं, पंधरा दिवसांत देणार अहवाल

शाब्दी म्हणाले, गेल्या विधानसभा निवडणुकीत मी नवीन होतो. तरीही मला तुम्ही सर्वांनी सहकार्य केले हे मी कधीही विसरू शकणार नाही. प्रत्येकाच्या अडचणीत मी भाऊ म्हणून तुमच्या पाठीशी राहणार आहे. खासदार ओवेसी यांच्या मार्गदर्शनाखाली आता महापालिका निवडणुकीत आपल्याला किंगमेकर व्हायचे आहे. त्यासाठी आजपासून कामाला लागावे. केवळ मुस्लिम समाजच नव्हे तर इतर समाजाच्या लोकांमध्येही जाऊन त्यांच्याही समस्या जाणून व सोडवा.

मतदार नोंदणी महत्त्वाची

सोलापूर शहर मध्यमधून एमआयएमचा आमदार होऊ शकतो. दरवेळी उमेदवार बदलण्याचा फटका आपल्याला बसला. २०१९ मध्ये आपण पराभूत झाल्यानंतर पाच वर्षे परिश्रम करून आता एमआयएम फारुख शाब्दी यांच्या रुपाने पुन्हा एकदा विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे राजा बागवान यांनी सांगितले.

Asaduddin Owaisi Political News
Pune ATS : आंबोलीच्या जंगलात स्फोटकांची चाचणी; दहशतवाद्यांना मदत करणारे स्थानिक कोण? ATS कडून 'त्या' दोघांची कसून चौकशी

नुसत्या घोषणा देण्यापेक्षा मतदार नोंदणीवर भर देण्याची आवश्‍यकता आहे. सध्या मतदार नोंदणी मोहीम सुरू आहे. मुस्लिम समाजातील व्यक्तींची जास्तीत जास्त मतदार नोंदणी केल्यास २०२४ मधून शाब्दी यांच्या रूपाने एमआयएमचा आमदार होईल असा विश्‍वासही बागवान यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.