गुन्हेगाराला शिक्षा व्हायलाच हवी, परंतु निरपराधांना शिक्षा नको, अशी अपेक्षा राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केली.
सोलापूर : हिंदू- मुस्लिम, शीख असो वा अन्य कोणाचाही धर्म, जात वेगळी असेल, परंतु सर्वांचे रक्त लाल आहे. तरीही, काहीजण जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांना वेळीच ओळखा आणि त्यांची जागा त्यांना दाखवून द्या. कुठेही दंगल झाली, काही झाले तर मुस्लिम (Muslim) तरुणांनाच टार्गेट केले जाते. गुन्हेगाराला शिक्षा व्हायलाच हवी, परंतु निरपराधांना शिक्षा नको, अशी अपेक्षा राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatraya Bharne) यांनी व्यक्त केली.
ईद-ए- मिलादनिमित्त महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्या वतीने शुक्रवारी डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात शहरातील आदर्श शाळा, आदर्श मुख्याध्यापक व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पालकमंत्री भरणे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. मंत्री होणे खूप अवघड असून त्यांना खूप टेन्शन असते. जीवनात शेवटी काहीही नसते, आनंद द्यायचा असतो आणि आनंद घ्यायचा असतो. चांगले काम केले तरीही, लोक गैरसमजातून बोलतात. पालकमंत्री म्हणून मी सोलापूरच्या विकासासाठी प्रयत्न केले असून यापुढेही करेन, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. चांगले काम करणाऱ्यांची लोक दखल घेतात, त्याला उशीर लागतो, पण त्याचे चांगलेच फळ मिळते. कोरोना काळात मी स्वत: दवाखाने, मेडिकलमध्ये फिरलो, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
पीपीई किट घालून दवाखान्यात जाणारा मी पहिलाच मंत्री
कोरोना काळात दवाखाने बंद होते, डॉक्टरांनी ओपीडीदेखील बंद केली होती. रुग्णांचे नातेवाईक त्याच्याजवळ थांबत नव्हते. त्याकाळात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मी पहिल्यांदा पीपीई किट घालून गेलो आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. रुग्णांच्या वॉर्डात जाऊन त्यांच्याशी संवाद साधणारा मी पहिला मंत्री आहे, असा दावा राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केला आहे.
कार्यक्रमात 'यांचा' झाला सन्मान
आदर्श शाळा : बेगम कमरुनिस्सा गर्ल्स हायस्कूल, श्री दिगंबर जैन गुरुकुल हायस्कूल, रोशन प्रशाला, सर सय्यद अहमद खॉं हायस्कूल
आदर्श मुख्याध्यापक : आफरीन सय्यद, सबीया पिरजादे, अ. जब्बार शेख, सबीना इंगळगी
आदर्श शिक्षक : सुरैय्या जहागीरदार, वर्षा रावडे, आफरीन लालकोट, वैशाली कटारे, साजीया शेख, परवीन होटगी, समीर बागवान, अश्पाक सातखेड, जुबेर मुजावर, नसरीन रजभरे, मोहसीना सिद्दकी
आदर्श शिक्षकेतर कर्मचारी : जमीर कोतकुंडे, शफी अन्सारी, नौशाद शेख
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.