सोलापूर : तिसऱ्या लाटेचा चुकला अंदाज

बाधितांमध्ये युवक, प्रौढ वर्गच अधिक
third wave of corona
third wave of coronasakal
Updated on

सोलापूर : पहिल्या लाटेत वयोवृध्द आणि को-मार्बिड, दुसऱ्या लाटेत प्रौढ तर तिसरी लाट लहान मुलांवर असल्याचे आरोग्य विभागाकडून वर्तविले जात होते. मात्र गेल्या वीस दिवसांत कोरोनाबाधितांचा वाढता आलेख पाहता तिसरी लाट ही प्रौंढावरच घाव घातल असल्याचे दिसून येते. दिवसाकाठी एकूण बाधितांपैकी प्रौढ बाधितांची संख्या ही ७५ टक्‍के इतकी आहे. शासनाच्या आदेशानुसार महापालिका प्रशासनाने तीन महिन्यांपूर्वी संभाव्य तिसरी लाट ही बालकांवर असल्याचा अंदाज व्यक्‍त करून तयारी केली होती. शहरातील १७ बालरुग्णाले सज्ज ठेवली होती. मुलांची प्रतिकारक्षमता लक्षात घेऊन आवश्‍यक ५५० बेडची तयारी केली होती.

third wave of corona
पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्र्यांचा 'पद्मभूषण' स्विकारण्यास नकार

कोरोनाबाधित मुलांसोबत आईला राहण्याची परवानगी दिली गेली. तिसऱ्या लाटेवर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाकडून नियोजनात्मक आराखडा तयार करण्यात आला होता. मात्र जानेवारी महिन्यात रुग्णसंख्या वाढू लागली. त्यातच ११ जानेवारीपासून रुग्णसंख्येत कमालीची वाढ दिसून आली. शहरातील रुग्णसंख्या दोनवरून हजारांवर गेली. मात्र कोरोनाबाधितांचा वाढता आलेख पाहता तिसऱ्या लाटेचा विळखा युवक व प्रौढांनाच असल्याचे दिसून येत आहे. लहान मुलांना दुसऱ्या लाटेत अनेक गुंतागुंतीला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे बालरोगतज्ज्ञ चिंतेत सापडले होते. तसेच लसीकरणाची शक्‍यतादेखील त्यावेळी अगदीच कमी होती. या स्थितीत तिसऱ्या लाटेत मात्र लहान मुलांच्या संसर्गात कोणतीही गुंतागुंत फारशी आढळत नाही ही समाधानाची बाब आहे. पण संसर्गाचा जोर व वेग अधिक आहे. तीन ते चार दिवसात संसर्ग कमीदेखील होतो आहे. पण लहान मुले गंभीर आजाराला सामोरे जाणार नाहीत अशी सध्याची स्थिती आहे.

third wave of corona
UP Election : मालेगाव स्फोटातील आरोपीची उमेदवारी 'जदयू'कडून मागे!

हुडहुडीमुळे सर्दी, खोकल्याचे वाढले रुग्ण

मागील आठवड्यापासून वातावरणात बदलाचा थेट शहरवासियांच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे. सर्दी व खोकल्याचे रुग्णही मोठ्या प्रमाणात वाढले असून मेडिकलव रुग्णालयामध्ये गर्दी वाढली आहे. शहरात १७ जानेवारीपासून वातावरण बदलास सुरवात झाली. किमान तापमान १५.५ वरून थेट पावणे दोन अंशानी घसरत १९ जानेवारी रोजी १३.९ वर आले. सकाळी व सायंकाळी थंडीची हुडहुडी अन्‌ दिवसभर चटका देणारे ऊन यामुळे सर्दी व खोकल्याचे रुग्ण वाढले. वाढत्या थंडीमुळे सोलापूकरांना हुडहुडी भरून येत आहे. अशीच परिस्थिती आणखी तीन दिवस राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आले आहे.

पंधरा दिवसांतील बाधित

शून्य ते १५ वयोगट - ३ ते २० टक्के

१६ ते ३० वयोगट - ३९ ते ७५ टक्के

३१ ते ५० वयोगट - ६८ ते ९३ टक्के

५१ ते ६० वयोगट - ११ ते ३७ टक्के

आणि ६० वर्षापुढील - १३ ते ४३ टक्के

third wave of corona
Punjab Election 2022 : माजी उपमुख्यमंत्री बादल यांचे मुख्यमंत्री चन्नी यांना आव्हान

तिसऱ्या लाटेची वैशिष्ट्ये

  • संसर्गाचा कालावधी फक्त ३ ते ४ दिवसाचा

  • थंडीचा परिणाम व संसर्गात फरक ओळखणे कठीण

  • लहान मुलांना संसर्गाची गुंतागुंत नाही

  • रुग्ण आपोआप बरे होण्याचे प्रमाण ९० टक्‍क्‍यापेक्षा अधिक

  • प्रौढांना संसर्गाचा अधिक त्रास

सध्या लहान मुलांना होणारा संसर्ग अगदीच सौम्य व कमी कालावधीचा आहे. तिसऱ्या लाटेत मुले बाधित झाले नाहीत याचा आनंदच आहे. परंतु तीन दिवसांपेक्षा अधिक काळ ताप राहिल्यास डॉक्‍टरांचा सल्ला घेऊन उपचार घ्यावेत. परिवारातील इतर सदस्यांमुळे मुलांना संसर्ग होणारी नाही याची काळजी पालकांनी घ्यावी.

- डॉ. अतुल कुलकर्णी, बालरोगतज्ज्ञ, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.