सुरुवातीला महाराष्ट्राचे भाजपाचे देवेंद्र तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट, यादरम्यान उठलेलं भाजपा प्रवेशाचे वादळ, तद्नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना कुर्डूवाडी येथे आणून पुतळा अनावरणाचा घेतलेला कार्यक्रम... यादरम्यान भाजपाच्या प्रवेशाची उठलेली राळ खाली बसलेली...अशातच पुन्हा पंढरपूर दौऱ्यात देवेंद्र फडणवीस यांच्या सोबतची सलगी... भाजप प्रवेशाच्या चर्चेला आलेला ऊत या सगळ्या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादीतील ज्येष्ठ आमदार आणि साखर कारखानदारी मधील बडं प्रस्थ आमदार बबनराव शिंदे हे राजकीय पटलावर मोठ्या चर्चेत आले आहेत.
दरम्यान एकीकडे बारामतीकर पवार परिवाराशी सलगी आणि दुसरीकडे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राबता अशा चाललेल्या माढेकर शिंदे परिवाराच्या हालचाली म्हणजे दोन्ही डगरीवर हात ठेवणे असाच वस्तुनिष्ठ आणि खराखुरा प्रकार असल्याचे उघड होत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून बबनदादा शिंदे आणि माजी आमदार राजन पाटील हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. मध्यंतरीच्या काळात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेटही घेतली होती. राजन पाटील हे वारंवार भाजपमध्ये जाण्याचे संकेत देत आहेत. असे असतानाच, आता बबनदादा शिंदे यांनी फडणवीस यांची भेट घेतल्याने तेही आता भाजपचा रस्ता धरणार का अशी चर्चा सुरू झाली आहे.
बबनदादा यांच्या हालचाली पाहून माढा नगरपालिकेच्या पुतळा अनावरण कार्यक्रमाप्रसंगी दस्तुरखुद्द शरद पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी हजेरी लावली होती. बबनदादा यांनी भाजपमध्ये जाऊ नये यासाठीच राष्ट्रवादीच्या नेत्यांचा हा प्रयत्न होता. मात्र आता बबनदादा शिंदे यांनी पंढरपूर दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन एक प्रकारे भाजपमध्ये जाणार असल्याचे संकेत दिल्याचे बोलले जात आहे.
पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृह आणि पंतनगर येथील आमदार प्रशांत परिचारक यांच्या घरीही बबनदादा उपस्थित होते. नेमके ते कोणत्या कारणासाठी भेटले आहेत याची माहिती उपलब्ध झाली नसली तरी ते त्याने विविध चर्चांना उधाण आलं आहे. त्यांच्यासमवेत पालकमंत्री विखे पाटील खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्यासह प्रशांत परिचारक उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.