वंचित आणि एमआयएम यांसारखे पक्ष देशाचे विभाजन करण्यासाठी उभे ठाकले आहेत, अशी टीका आमदार प्रणिती शिंदे यांनी केली.
सोलापूर : येत्या 15 ऑगस्टला संपूर्ण भारत देश आपला 75वा स्वातंत्र्यदिन (Independence Day) साजरा करणार आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) आणि एमआयएम (MIM) यांसारखे पक्ष देशाचे विभाजन करण्यासाठी उभे ठाकले आहेत, अशी टीका आमदार प्रणिती शिंदे (MLA Praniti Shinde) यांनी केली. आगामी महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही नेतेमंडळी सत्ताधारी पक्षात प्रवेश करताना पाहायला मिळत आहेत. अशांचा ना कोणी बॉस आहे, नाही यांना काही निधी मिळतो. मात्र, सोलापुरात कॉंग्रेसचा (Congress) एकच "वन मॅन शो' आहे, तो म्हणजे सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde), असे म्हणत आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपसह (BJP) विविध पक्षांच्या टार्गेट करत सुशीलकुमार शिंदे यांचे सोलापूरसाठी असलेले महत्त्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला.
आमदार प्रणिती शिंदे या इलियास शेख यांच्या "कॉंग्रेस संपर्क कार्यालया'च्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, जेंव्हा भारतीय जनता पक्ष नव्हता तेव्हा वंचित आणि एमआयएम हे पक्षही नव्हते. परंतु जेव्हा भाजप मैदानात उतरतो तेव्हा भाजपला मदत करण्यासाठी वंचित आणि एमआयएम काम करत असतात.
जेव्हा सामान्य माणसाला गरज असते तेव्हा यापैकी कोणीच नसतं आणि जेव्हा निवडणुका येतात तेव्हाच हे पक्ष गरीब मतदारांचा उपयोग करून घेण्यासाठी येतात, अशी टीकाही आमदार प्रणिती शिंदे यांनी केली.
त्या पुढे म्हणाल्या, आगामी महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही नेतेमंडळी सत्ताधारी पक्षात प्रवेश करताना पाहायला मिळत आहेत. अशांचा ना कोणी बॉस आहे, ना ही यांना निधी मिळतो. मात्र सोलापुरात कॉंग्रेसचा एकच "वन मॅन शो' आहे, तो म्हणजे सुशीलकुमार शिंदे.
महाराष्ट्र कॉंग्रेस प्रदेश कार्याध्यक्षपदाची जबाबदारी अंगावर पडल्यानंतर आगामी सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने आमदार प्रणिती शिंदे या मागील काही दिवसांपासून विरोधकांवर जोरदार टीका करताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील राजकारण आतापासूनच तापायला सुरवात झाली आहे.
बातमीदार : विश्वभूषण लिमये
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.