आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण मिळेलच, त्यासाठी आम्ही सर्वजण सोबत आहोत.
सोलापूर : राज्यातील भटक्या विमुक्त जाती, जमाती आणि ओबीसी समाजाने लोकशाही टिकवून ठेवली आहे. या समाजाचे राजकीय आरक्षण (Political reservation) रद्द झाले असून, ते मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण मिळेलच, त्यासाठी आम्ही सर्वजण सोबत आहोत. ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) हे पुढे असतील आणि त्यांच्यासोबत दुसरे पाऊल माझे असेल, असा विश्वास आमदार प्रणिती शिंदे (MLA Praniti Shinde) यांनी व्यक्त केला.
भटक्या समाज मुक्ती दिनानिमित्त आज (मंगळवारी) सोलापुरातील विजयपूर रोडवरील गंगा लॉन येथे निर्धार मेळावा पार पडला. या वेळी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची प्रमुख उपस्थिती होती. मेळाव्याच्या प्रारंभी व्यासपीठाला स्व. गणपतराव देशमुख यांचे नाव देण्याचा ठराव झाला. मेळाव्याप्रसंगी आमदार प्रणिती शिंदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या वेळी महापौर श्रीकांचना यन्नम, आमदार राजेश राठोड, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी खासदार हुसेन दलवाई, माजी आमदार रामहरी रूपनवर, रामराव वडकुते, नरसय्या आडम, माजी महापौर अलका राठोड, नलिनी चंदेले आदी उपस्थित होते. ओबीसी, व्हीजेएनटी संघर्ष समन्वय समितीचे राज्य समन्वयक शरद कोळी यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते.
आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण मिळेलच, त्यासाठी आम्ही सर्वजण सोबत आहोत. ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार हे पुढे असतील आणि त्यांच्यासोबत दुसरे पाऊल माझे असेल. त्यांची बहीण म्हणून मी त्यांच्यासोबत सदैव असेन आणि त्या माध्यमातून राज्यातील ओबीसी, भटक्या विमुक्त जमातींसह उपेक्षित समाजाचे प्रश्न सोडवू. देशातील लोकशाही टिकवण्याचे काम या वर्गाने केले आहे.
तुम लढो अन्... असे नकोच
पक्ष, मतभेद बाजूला सारून सर्वांनी आरक्षणासाठी व न्याय्य हक्कासाठी संघटिपणे लढा देण्याची गरज आहे. सर्वांनी आपला पक्ष कोणता हे न पाहता एकत्रित आल्यास निश्चितपणे आरक्षण मिळेल, असा विश्वास माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी व्यक्त केला. उपाशीपोटीच क्रांती होत असते, असेही ते म्हणाले. परंतु, तुम आगे चलो, हम कपडे सॅंभालते है, अशी भूमिका नको, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
वडेट्टीवारांसारखा मुख्यमंत्री हवा
राज्याच्या सत्तेत असतानाही कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ओबीसींच्या हक्काची चळवळ हाती घेतली आहे. त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभारू. शिक्षण, नोकरीपासून वंचित समाजाचे राजकीय आरक्षणही गेले. त्यामुळे या समाजाने जगायचे कसे, असा प्रश्न माजी आमदार नरसय्या आडम यांनी उपस्थित केला. तमिळनाडूमध्ये आरक्षण 69 टक्क्यांपर्यंत असतानाही त्या ठिकाणी काहीच बदल झाला नाही. मग, आपल्याकडेच असा भेदभाव का, असेही ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्याला आरक्षण देण्याचा अधिकार दिला, पण तो अधर्वट असल्याची टीकाही त्यांनी या वेळी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.