पाणी नसल्याने गावातील महिलांना पाणी मिळवण्यासाठी खूप त्रास होत होता. पुरुष मंडळी कामावर गेल्यावर महिला पाण्यासाठी डोक्यावर हंडा घेऊन पाण्यासाठी भटकत होत्या.
सलगर बुद्रुक : ऐन पावसाळ्यात महिनाभरापासून गावात पिण्यासाठी पाणी विकत घ्यावे लागत आहे. सार्वजनिक पाणी पुरवठा विस्कळीत झाला असून याला जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाही व्हावी अशी मागणी सलगर बुद्रुक येथील महिलांनी आमदार आवताडे यांच्याकडे केली होती. 'आपला आमदार आपल्या गावी या उपक्रमाअंतर्गत आमदार समाधान आवताडे (Samadhan Autade) हे सलगर बुद्रुक या गावात दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले होते.