पालकमंत्र्यांच्या नावे खपविले कोरोनाचे अपयश !

आमदार व खासदारांनी कोरोना अपयशाला पालकमंत्र्यांना जबाबदार धरले
MLAs
MLAsCanva
Updated on

सोलापूर : कोरोनाच्या पहिल्या लाटेचा (The first wave of Corona) अनुभव आल्यानंतर दुसऱ्या लाटेपूर्वी जिल्ह्यातील आमदार- खासदारांनी मतदारसंघातील जनतेसाठी आपल्या निधीतून आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याकडे लक्ष देण्याची गरज होती. त्याकडे त्यांनी सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत राजकीय विरोध करण्याची एकही संधी मात्र सोडली नाही. कधी लसीवरून (Vaccine) तर इंजेक्‍शन, (Injection) कधी महागाई (Inflation) तर कधी राज्य सरकारच्या कोरोना (Covid-19) रोखण्याच्या अपयशावर सत्ताधारी व विरोधकांनी एकमेकांवर टीकेची झोड उठवत आंदोलने केली. परंतु, मोजके आमदार वगळता एकाही आमदार, खासदाराने दुसऱ्या लाटेत वेळेत निधी दिला नाही. पालकमंत्री दत्तात्रय भरणे (Guardian Minister Dattatraya Bharane) यांच्या नावावर आपले अपयश खपविण्याचा प्रयत्न मात्र त्यांनी सोडला नाही, अशी चर्चा आहे. (MLAs and MPs blamed the Guardian Minister for Corona's failure)

MLAs
लॉकडाउनचा पुढील टप्पा 15 जूनपर्यंत? मृत्यूदराने वाढविली चिंता

सोलापूर जिल्ह्यात 11 विधानसभा मतदारसंघ असून दोन विधान परिषदेचे आमदार आहेत. तसेच माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे दोन खासदारही आहेत. जिल्ह्याची लोकसंख्या 43 ते 45 लाखांपर्यंत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत अनेकांचे संसार उद्‌ध्वस्त झाले तर अनेकजण रस्त्यावर आले. पहिली लाट ओसरतानाच आरोग्य विभागाने दुसऱ्या लाटेची पूर्वकल्पना दिली होती. अशा परिस्थितीत राज्य सरकारने आमदारांना मिळणाऱ्या दोन कोटींपैकी एक कोटीचा निधी कोव्हिडसाठी खर्चास परवानगी दिली. त्यानंतर सर्वच आमदारांनी तो निधी त्यांच्या त्यांच्या मतदारसंघातील आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी देणे अपेक्षित होते. मात्र, तसे काहीच झाले नाही. एप्रिलपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आणि शहराबरोबरच ग्रामीण भागाची रुग्णसंख्या दीड लाखापर्यंत पोचली. तर साडेतीन हजार जणांचे कोरोनाने बळी घेतले. पालकमंत्र्यांनी लक्ष दिले नाही, पालकमंत्री बदला, पालकमंत्र्यांमुळेच सगळे घडले अशी टीका करणाऱ्या बहुतेक आमदारांनीही त्या वेळी आपला आमदार निधीचा एक छदामही कोव्हिडसाठी दिला नव्हता, हे विशेष. आता सर्वच आमदारांनी त्यांचा निधी कोव्हिडसाठी देऊ केला असून, निधीची पत्रे जिल्हा नियोजन कार्यालयाकडे पाठविली आहेत. परंतु, कोरोनाची दुसरी लाट येण्यापूर्वी अथवा आल्यानंतर तत्काळ तो निधी देऊन उपाययोजना का केल्या नाहीत, राजकीय विरोधात जनतेचे हाल झाले, अनेकांना जीव गमवावा लागला, त्याला जबाबदार नेमका कोण, असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे.

MLAs
सर्वच विद्यार्थ्यांची जून ते ऑगस्टमध्ये परीक्षा !

दोन्ही खासदारांकडून जिल्ह्यासाठी छदामही नाही

केंद्र सरकारने कोरोना काळात तिजोरीची आर्थिक स्थिती बिघडल्याने दोन वर्षासाठी खासदार निधी ब्रेक केला. मात्र, यापूर्वी दिलेल्या निधीतील दोन- चार कोटींचा निधी दोन्ही खासदारांचा अजूनही शिल्लक असल्याची माहिती जिल्हा नियोजन कार्यालयातील सूत्रांनी दिली. माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर व सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी यांनी कोरोना काळात अनेक ठिकाणी दौरे केले. अनेक आंदोलनात सहभाग नोंदविला, परंतु त्यांचा शिल्लक निधी कोरोनासाठी दिला नाही. आता डॉ. महास्वामी यांनी निधी देण्यासंदर्भात अधिकाऱ्यांची भेट घेतल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. तर दुसऱ्या खासदारांकडून निधी मिळाल्याचे एकही पत्र आम्हाला मिळाले नसल्याचेही जिल्हा नियोजन कार्यालयातील सूत्रांनी सांगितले.

कोरोना काळात राजकारणालाच दिले महत्त्व

जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट गडद होत होती. अनेकजण बाधित होऊन समूह संसर्ग वाढल्याने कुटुंबातील सर्वजण कोरोना बाधित होत होते. रुग्णालयात बेड मिळण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते. ऑक्‍सिजन, रेमडेसिव्हिर, व्हेंटिलेटरची कमतरता भासत होती. बेड वेळेत उपलब्ध न झाल्याने अनेकांना जीव गमवावा लागत होता. महापालिका असो वा जिल्हा प्रशासनाला कोरोना रोखण्यात यश येत नव्हते. त्यांच्याकडेही पुरेशा प्रमाणात निधी नव्हता तथा निधी खर्च करण्यास मर्यादा होत्या. अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधींनी त्यांच्या निधीतून प्रशासनाला मदत करण्याची गरज असतानाही केवळ आणि केवळ राजकीय विरोधच या काळात केल्याची चर्चा आहे. विरोधकांनी कधी पालकमंत्र्यांवर तर कधी राज्य सरकारवर टीका केली. दुसरीकडे, सत्ताधाऱ्यांनी केंद्र सरकारला धारेवर धरल्याचे चित्र पाहायला मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.