मोहोळ - संपूर्ण राज्यात चर्चिला गेलेल्या मोहोळ विधानसभा मतदारसंघात प्रचाराच्या अखेरच्या दिवशी मोठी राजकीय घडामोडी घडली असून, या निवडणुकीच्या रिंगणातील अपक्ष उमेदवार संजय क्षीरसागर यांनी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राजू खरे यांना पाठिंबा दिला..या घडामोडी मुळे राजू खरे यांना बळ मिळाले आहे, तर आमदार यशवंत माने यांच्या पुढील अडचणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आता खरी लढत एकास एक म्हणजे महाविकास आघाडीचे उमेदवार राजु खरे विरुद्ध महायुतीचे उमेदवार आमदार यशवंत माने अशी होत आहे..गेल्या 30 वर्षापासून संजय क्षीरसागर हे भाजपात सक्रिय होते. त्यांना विधानसभा निवडणूक लढविण्याची इच्छा होती. मात्र एवढे काम करूनही भाजपा मधील अंतर्गत कुरघोड्यामुळे क्षीरसागर यांची संधी प्रत्येक वेळी हुकत असे. दरम्यान त्यांनी भाजपाला जय श्रीराम करत मोहोळ येथे खा शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांच्या पक्षात लोकसभेपूर्वी प्रवेश केला. त्याच वेळी त्यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित झाली होती..विधानसभेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर क्षीरसागर यांनी शरद चंद्र पवार पक्षाकडे उमेदवारी मागितली. मात्र त्यांना उमेदवारी नाकारली त्यामुळे त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. मोठ्या जोमात प्रचारही केला. दरम्यान शरदचंद्र पवार पक्षाकडून माजी आमदार रमेश कदम यांची कन्या सिद्धी कदम हिला उमेदवारी मिळाली..मात्र, ती उमेदवारी रद्द करण्यास मोहोळ बचाव संघर्ष समितीने भाग पाडून राजू खरे यांना ती उमेदवारी मिळविण्यात यशस्वी झाले. अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यानंतर क्षीरसागर यांनी प्रचार ही जोरात सुरू केला ते मतदार संघातील 143 गावात पोहचले. त्यामुळे त्यांनी निवडणुकीतील चुरस वाढविली. त्यामुळे क्षीरसागर यांचा फायदा आता कोणाला होणार हे येत्या 23 तारखेला समजणार आहे..दरम्यान क्षीरसागर यांच्याशी संवाद साधला असता, मी पूर्ण मतदार संघ पिंजून काढला आहे. मतदारांनी मला तुतारी हाती घेण्याचा सल्ला दिला. दरम्यानच्या काळात मी खा. पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व संघर्ष समितीच्या संपर्कात होतो. पक्षादेश व लोकभावनांचा आदर करून मी खरे यांना पाठिंबा दिल्याचे त्यांनी सांगितले.#ElectionWithSakal.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.