मोहोळ - मोहोळ विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या आजच्या तिसऱ्या दिवशी गूरूपुष्यामृतचा मुहूर्त साधत आमदार यशवंत माने, (राष्ट्रवादी उपमुख्यमंत्री अजित पवार गट) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तीन दिवसात 34 जणांनी 69 फॉर्म नेले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सीमा होळकर यांनी दिली.