Mohol Crime : हुंडा व सोन्यासाठी विवाहीतेने केली आत्महत्या, नवरा, सासू, सासरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल

विवाह सोहळ्यात सासरच्या मंडळींनी हुंडा म्हणून दोन लाख रुपये व पाच तोळे सोन्याचे मागणी केली होती. मात्र, ती पूर्तता आम्ही करू न शकल्याने मुलीचा छळ होत होता.
Crime
Crimeesakal
Updated on

मोहोळ - विवाह सोहळ्यात सासरच्या मंडळींनी हुंडा म्हणून दोन लाख रुपये व पाच तोळे सोन्याचे मागणी केली होती. मात्र, ती पूर्तता आम्ही करू न शकल्याने मुलीचा छळ होत होता, त्या छळाला कंटाळूनच माझ्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

याला नवरा, सासू, सासरे हेच जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांनीच माझ्या मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार मोहोळ पोलिसात दाखल झाली आहे. त्यामुळे आष्टे, ता. मोहोळ येथील ज्ञानेश्वरी गावडे आत्महत्या प्रकरणाला वेगळी वळण लागले आहे.

मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार, कुमठे, ता. उत्तर सोलापूर येथील आप्पाशा नायकुडे यांची मुलगी ज्ञानेश्वरी हिचा विवाह सन 2019 साली आष्टे, ता. मोहोळ येथील भालचंद्र सुरेश गावडे यांच्याबरोबर हिंदू रितीरिवाजाप्रमाणे संपन्न झाला.

Crime
Baramati Politics : बारामतीतील राजकीय वातावरण तापणार

विवाह सोहळ्यात नवरा भालचंद्र गावडे, सासू पद्मिनी गावडे, सासरा सुरेश गावडे यांनी दोन लाख रुपये हुंडा व पाच तोळे सोन्याची मागणी केली होती. आप्पाशा नायकुडे हे रिक्षा चालवतात, तर त्यांची पत्नी अनुराधा नायकुडे या नर्स म्हणून काम करतात. परिस्थिती अडचणीची असल्याने सासरच्या मंडळींनी हुंड्यात मागितलेले सोने व रोख रकमेची पूर्तता होऊ शकली नाही. तरी ही नायकुडे पती-पत्नीने दीड लाख रुपये रोख व तीन तोळे सोने सासरच्या मंडळींना दिले होते.

विवाह झाल्यावर सासरच्या मंडळींनी ज्ञानेश्वरी हिला एक महिना व्यवस्थित नांदविले. नंतर मात्र हुंड्यातील राहिलेले 50 हजार रुपये व दोन तोळे सोने घेऊन ये, म्हणून तिला तगादा लावला. तुला स्वयंपाक येत नाही, काम नीट करीत नाही, मानपान नीट केला नाही, असे म्हणून ज्ञानेश्वरीला शिवीगाळ व मारहाण करत होते.

Crime
Motivation News : दुचाक्यांच्या फुटरेस्ट संशोधनावर पेटंट घेऊन दोन तरुणांनी उभारला उद्योग

मुलीने या बाबत आई-वडिलांकडे तक्रार केल्यानंतर आई-वडिलांनी आष्टे येथे येऊन नवरा, सासू, सासरे यांना समजावून सांगून मुलीची समजूत काढली. समजावून सांगूनही सासरच्या मंडळीच्या वागण्यात फरक पडला नाही, तगादा कमी झाला नाही. ज्ञानेश्वरी गावडे ही मोहोळ येथील ब्लड बँकेत टेक्निशियन म्हणून कार्यरत होती. ती महिन्याचा पगारही तिच्या नवऱ्याच्या हातात देत होती. मात्र त्यांचे समाधान होत नव्हते.

अखेर ज्ञानेश्वरी हिने या त्रासाला वैतागून ता. 18 रोजी आष्टे येथील राहत्या घरातील पत्र्याच्या लोखंडी पाइपला ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत आई अनुराधा नायकुडे यांनी मोहोळ पोलिसात फिर्याद दिली असून अधिक तपास मोहोळ पोलीस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.