मोहोळ - मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांच्या कडून खंडणी घेणे किंवा त्यांना जीवे ठार करण्याच्या उद्देशाने त्यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न करणे प्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात तिघा जणा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेची तातडीने दखल घेत मोहोळ पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. ही घटना ता 18 नोव्हेंबर रोजी मोहोळ परिसरात घडली.