मोहोळ - काही तासावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोहोळ पोलिसांनी गणेशोत्सव निर्भय वातावरणात पार पडावा यासाठी गुरुवार ता. 5 रोजी शहराच्या मुख्य रस्त्यावरून पथसंचलन केले. न्याय संहितेच्या विविध कलमान्वये 60 जणावर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. तर 30 गणेश मंडळांना नोटीसा दिल्याची माहिती मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत यांनी दिली.पथसंचलनामुळे गुन्हेगारांची धडकी भरली आहे.