Solapur News : खोटा विवाह लावून आर्थिक फसवणूक करणाऱ्या सहा जणांच्या टोळीचा पर्दाफाश; अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता

Solapur Crime News : याप्रकरणी पाच महिलांसह एका पुरुषाविरोधात मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
Mohol police nabbed gang of six people committed financial fraud by arranging fake marriages crime News
Mohol police nabbed gang of six people committed financial fraud by arranging fake marriages crime News
Updated on

मोहोळ : एका 30 वर्षीय युवकाचा खोटा विवाह लावून त्याची सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम घेऊन तीन लाख 21 हजाराची फसवणूक करणाऱ्या सहा जणांच्या टोळीला मोहोळ पोलिसांनी पकडले आहे. त्यांच्या कडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. याप्रकरणी पाच महिलांसह एका पुरुषाविरोधात मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान या प्रकरणातील चार महिलांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना न्यायालया पुढे उभा केले असता गुरुवार पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.

मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार, देगाव(वा) ता मोहोळ येथील नितीन विष्णू भोसले वय 25 हे मुंबई येथील एका खाजगी कंपनीत नोकरी करतात. वडील शेती तर भाऊ विद्युत महावितरण मध्ये नोकरी करतो. दरम्यान नितीन याचा थोरला भाऊ सचिन, वय 30 याच्या विवाहासाठी मुलगी शोधण्याचे काम सुरू होते. मात्र विवाह जुळून येत नव्हता. दरम्यान नितीन याने त्याच्या मावस भावाला सचिन साठी मुलगी बघ असे सांगितले होते. मावस भावाने विवाह जुळविणारा एजंट गंगाधर लाडबा ढेरे (रा. कोळेगाव बुद्रुक, ता भोकर, नांदेड) याचा नंबर नितीनला दिला. दिलेल्या नंबरवर नितीन ने संपर्क साधला असता मुलगी आहे, परंतु विवाह जमला तर रोख रक्कम अडीच लाख व गाडी भाड्यासाठी अकरा हजार रुपये रोख असे एकूण दोन लाख 61 हजार रुपये द्यावे लागतील अशी अट घातली. ती अट मान्य झाल्यावर मुलीकडच्या मंडळींनी व्हाट्सअप वर मुलीचे फोटो पाठविले. घरातील सर्वांनी ती मुलगी पसंत पडल्यावर नितीन भोसले कुटुंबीय रक्कम देण्यास तयार झाले.

दरम्यान दोन एप्रिल रोजी मुलगी व अन्य पाच जण असे एकूण सहा जण दुपारी दोन वाजता चार चाकी गाडीतून देगाव येथे आले. घरी आल्यावर सर्वांची संयुक्त बैठक झाली. ठरल्या प्रमाणे रोख रक्कम देण्याचे व त्याच दिवशी विवाह करण्याचे ठरले. त्या प्रमाणे नितीनच्या फोन पे वरून वेगवेगळ्या रकमेसह पाच वेळा एक लाख तीस हजार रुपये पाठवून दिले. त्याच वेळी सचिन याने ही चार वेळा वेगवेगळी रक्कम पाठवली एकूण दोन लाख 41 हजार रुपये मुलीच्या नातेवाईकांना पोहोचले. पैसे मिळाल्यावर त्याच दिवशी 2 एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजता भोसले कुटुंबियाच्या घरी घरगुती पद्धतीने विवाह सोहळा पार पडला. आलेले नातेवाईक मुलीला सोडून गेले.

Mohol police nabbed gang of six people committed financial fraud by arranging fake marriages crime News
Papua New Guineas: पापुआ न्यू गिनीमध्ये भूस्खलन! संयुक्त राष्ट्रांने ढिगाऱ्याखाली 670 हून अधिक लोक दबल्याची भीती केली व्यक्त

दरम्यान ता. 10 रोजी मुलीचा भाऊजी शैलेश याचा फोन आला की, घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे. तुम्ही मुलीला घेऊन या व कार्यक्रम संपल्यावर परत घेऊन जा. त्या प्रमाणे वडील व मुलगी ता 13 रोजी रात्री खाजगी लक्झरीने गेले, ते 14 ला सकाळी साडेसात वाजता नागपूर हायवे वर उतरले. त्यावेळी शैलेश हा त्या ठिकाणी आला होता. त्याने रिक्षा करून मुलगी व विष्णू भोसले यांना अकोला बस स्थानकावर घेऊन गेला. विवाहित मुलीने लघुशंकेचे निमित्त करून गेली ती परत आलीच नाही, तर शैलेश याने आपल्याला घरी जाण्यासाठी गाडी येणार आहे ती आली का म्हणून बघून येतो म्हणून गेला. तो ही गायब झाला. बराच वेळ शोधाशोध केल्यानंतर विष्णु भोसले यांना दोघे ही मिळून आले नाहीत. त्यावेळी आपली फसवणूक झाल्याचे विष्णू भोसले यांच्या लक्षात आले. घरातून जाताना मुलीने अंगावर सोन्याचे दागिने, फुले, झुबे, मंगळसूत्र चांदीचे पैंजण व जोडवी असा एकूण 53 हजाराचा ऐवज व घरातील रोख 27 हजार रुपये घेऊन गेली.

दरम्यान 25 मे रोजी नितीन भोसले व कुटुंबीयांना समजले की, आपली फसवणूक केलेल्या महिला पेनुर ता मोहोळ येथील एका मंगल कार्यालयात कोंडी ता उत्तर सोलापुर येथील प्रथमेश भोसले यांचा फसवून विवाह करण्यासाठी येणार आहेत. खातर जमा करण्यासाठी नितीन भोसले व कुटुंबीय पेनुर येथील मंगल कार्यालयात गेले. त्या ठिकाणी फसवणूक केलेल्या महिला त्यांना दिसुन आल्या. नितीन भोसले कुटुंबीयांनी तातडीने मोहोळ पोलीस ठाण्याची संपर्क करून वरील हकीकत सांगितली. दरम्यान पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार चंद्रकांत आदलिंगे व अन्य पोलीस पथक सोबत भोसले कुटुंबीय पेनुरला मंगल कार्यालयात आले असता, नवीन होणारी नवरी व अन्य तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणी खोटा विवाह लावून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण तीन लाख 21 हजाराची फसवणूक केल्या प्रकरणी नितीन भोसले रा देगाव यांनी मोहोळ पोलिसात फिर्याद दिली आहे. या प्रकरणातील चार महिलांना पोलिसांनी अटक केली आहे. तर दोघे जण फरार आहेत. अटक केलेल्या चौघींना गुरुवार पर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. या घटनेचा तपास हवालदार चंद्रकांत आदलिंगे करीत आहेत.

Mohol police nabbed gang of six people committed financial fraud by arranging fake marriages crime News
Akola Crime News : 'सावकाराकडून ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न...'; व्हायरल व्हिडीओने महाराष्ट्रात खळबळ, वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

पोलीसांनी केला पाठलाग

दरम्यान कोंडी येथील प्रथमेश भोसले यांचा विवाह पंढरपूर येथेच करण्याचे या टोळीचे ठरले होते. मात्र देगाव येथील नितीन भोसले यांच्या तक्रारीवरून मोहोळ पोलीस त्या टोळीचा मागावर होते. त्यांनी त्यांच्याशी बोलणे चालू ठेवले. पंढरपूर येथे फुलांचे हार ही पोलीसांनी घेतले व आपण पेनुर येथील मंगल कार्यात विवाह सोहळा उरकू असे सांगून त्या टोळीला पेनुर येथील एका मंगल कार्यालयात आणले. त्यामुळे पोलिसांनी नाट्यमय रित्या या टोळीला पकडले आहे.

विवाह जुळवताना आहारी न जाता पूर्ण चौकशी करावी. मध्यस्थी ओळखीचा असावा. मुलीच्या घरी जाऊन तिच्या नातेवाईकाची व अन्य बाबीची चौकशी करावी. फसवणूक करणाऱ्या टोळ्या पासून सावध राहावे.

सुरेशकुमार राऊत----

पोलीस निरीक्षक मोहोळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.