अखेर मोहोळ ग्रामीण रुग्णालयाला मिळाली रुग्णवाहिका!

अखेर मोहोळ ग्रामीण रुग्णालयाला मिळाली रुग्णवाहिका!
अखेर मोहोळ ग्रामीण रुग्णालयाला मिळाली रुग्णवाहिका!
अखेर मोहोळ ग्रामीण रुग्णालयाला मिळाली रुग्णवाहिका!Canva
Updated on
Summary

गेल्या अनेक वर्षांपासून तसेच ऐन कोरोना काळात रुग्णांना रुग्णवाहिकेविना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

मोहोळ (सोलापूर) : 'सकाळ'ने केलेल्या पाठ पुराव्याला अखेर यश आले. गेल्या अनेक वर्षांपासून तसेच ऐन कोरोना (Covid-19) काळात रुग्णांना रुग्णवाहिकेविना (Ambulance) अनेक अडचणींचा सामना करावा लागला. याबाबत "सकाळ'ने पाठपुरावा केला असून, अखेर आमदार यशवंत माने (MLA Yashwant Mane) यांच्या विकास निधीतून 27 लाख रुपयांची अत्याधुनिक सर्व सोयींनी परिपूर्ण रुग्णवाहिका मोहोळ ग्रामीण रुग्णालयाला (Mohol Rural Hospital) मिळाली आहे. याचा लोकार्पण सोहळा आमदार यशवंत माने, माजी आमदार राजन पाटील (Former MLA Rajan Patil) यांच्या हस्ते पार पडला.

अखेर मोहोळ ग्रामीण रुग्णालयाला मिळाली रुग्णवाहिका!
पंढरपूर तीर्थक्षेत्र विकासाबाबतची उदासीनता कधी दूर होणार?

गेल्या अनेक वर्षांपासून मोहोळ ग्रामीण रुग्णालयाला रुग्णवाहिका नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली होती. कोरोना काळात चाचणी केलेल्या रुग्णाला विलगीकरण कक्षात पाठवणे अडचणीचे झाले होते. रुग्णवाहिका मिळावी यासाठी राष्ट्रवादीचे राज्य समन्वयक रमेश बारसकर यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना साकडे घातले होते, भाजपचे शहराध्यक्ष सुशील क्षीरसागर यांनी खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्याकडेही मागणी केली होती. अडचणीचा काळ व प्रशासनाची बेफिकिरी पाहून "सकाळ'ने वेळोवेळी याबाबत आवाज उठवला होता. गेल्या दोन महिन्यांपूर्वी सोलापूर जिल्ह्यासाठी जिल्हा परिषदेच्या नऊ रुग्णवाहिका आल्या होत्या. आमदार यशवंत माने यांनी यातील एक रुग्णवाहिका मोहोळसाठी मिळवू, अशी ग्वाही दिली होती. मात्र त्याही वेळी मोहोळ ग्रामीण रुग्णालयाला ठेंगाच मिळाला. विशेष म्हणजे रुग्णालयाला रुग्णवाहिका नाही म्हणून रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. पी. पी. गायकवाड यांनी राजीनामा दिला होता. हे राज्यातील एकमेव उदाहरण होते.

अखेर मोहोळ ग्रामीण रुग्णालयाला मिळाली रुग्णवाहिका!
'डीसीसी'ची नोव्हेंबरमध्ये निवडणूक ! मंगळवारपासून प्रक्रिया सुरू

या वेळी आमदार माने, माजी आमदार राजन पाटील यांच्यासह प्रकाश चवरे, सज्जन पाटील, प्रमोद डोके, रामदास चवरे, महेश पवार, हनुमंत पोटरे ,माऊली चव्हाण, मुस्ताक शेख, बाळासाहेब भोसले, प्रशांत बचुटे, यशोदा कांबळे यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, डॉ. गायकवाड, डॉ. बालाजी गवाड व त्यांचे सर्व सहकारी कर्मचारी उपस्थित होते.

मोहोळ ग्रामीण रुग्णालयाची रुग्णवाहिकेची अडचण आता दूर झाली आहे. त्यामुळे रुग्णांना योग्य वेळी त्याचा फायदा होणार आहे.

- आमदार यशवंत माने, मोहोळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.