Mohol News : पराभव होऊनही सावित्रीच्या लेकीसाठी दिलेला शब्द खरा केला

सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. जयदीप दाईंगडे यांच्या वतीने मलिकपेठ, दाईंगडेवाडी व खरकटने या गावांच्या वस्तीवरुन शाळेला येणाऱ्या 25 विध्यार्थीनींना सायकलींचे मोफत वाटप करण्यात आले.
Cycle Distribution
Cycle DistributionSakal
Updated on

मोहोळ - प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मलिकपेठ, ता. मोहोळ येथील सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. जयदीप दाईंगडे यांच्या वतीने मलिकपेठ, दाईंगडेवाडी व खरकटने या गावांच्या वस्तीवरुन शाळेला येणाऱ्या 25 विध्यार्थीनींना सायकलींचे मोफत वाटप अ‍ॅड. दाईंगडे यांच्या मातोश्री वत्सला दाईंगडे यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी अ‍ॅड. दाईंगडे म्हणाले, गावातील मुली शिकल्या तरच त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी सारख्या कर्तबगारी गाजवतील, प्रशासनात अधिकारी होतील. शाळा लांब पडते म्हणून शाळा सोडणे योग्य नाही. आज देशाच्या प्रजासत्ताकदिनी आपण डॅा. बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना स्वीकारली.

याच दिवशीचे औचित्य साधून, पुण्यश्लोक अहिल्यामातेच्या नावाने गावातील मुलींना सायकल भेट दिली. याचे मला मोठे समाधान वाटले. ज्या गावातील लहान थोरांचा आशिवार्द घेऊन मोठा झालो, त्याच गावात आपल्या लेकींसाठी काम केल्याचे समाधान आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंच पदासाठी उमेदवारी दाखल केली होती.

त्यावेळी ग्रामस्थांच्या काही मागण्या केल्या होत्या. त्यात प्रामुख्याने वस्तीवरून शिक्षणासाठी मुलींना पायी प्रवास करावा लागत होता. सत्ता येऊ अथवा न येऊ पण वस्तीवरच्या विद्यार्थिनींना सायकलचे वाटप करणार असा निर्धार केला होता. तो आज सायकल घेताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचे आनंद पाहून दिलेला शब्द खरा केला याचे समाधान वाटत आहे.

यावेळी माजी सरपंच तानाजी माळी, सैपन शेख, बलभीम आवारे, माजी उपसरपंच बाळासाहेब कसबे, माजी ग्रामपंचायत सदस्य राम साठे, भारत आवारे, अंबादास हजारे, नूतन पोलीस पाटील अमोल काळे, नूतन ग्रामपंचायत सदस्य विद्या रजनीश कसबे, नागेश हजारे, लिंगादेव काळे, राजन पाटील विद्यालयचे मुख्याध्यापक भालचंद्र जाधव, श्री. मोटे, नवनाथ आवारे, दादा गावडे, रामा नाईकवडे, सिद्धेश्वर डोंगरे, हनुमंत काळे, रवी हजारे, आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रजनीश कसबे यांनी केले. आभार नागेश हजारे यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.