मोहोळ - मोहोळ विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून, आचार संहितेचा भंग करणाऱ्या वर थेट कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान निवडणुकीच्या प्रक्रियेतील उमेदवाराने त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्याचे तीन वेळा प्रसिद्धीकरण करणे गरजेचे असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी श्रीमती सीमा होळकर यांनी दिली.