Monsoon Session : मोहोळ विधानसभा मतदार संघातील रस्त्यांच्या कामासाठी 25 कोटी; यशवंत माने

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विशेष प्रयत्नातून हा निधी मिळाल्याचे आमदार माने यांनी सांगितले.
yashwant mane
yashwant manesakal
Updated on

मोहोळ : मोहोळ विधानसभा मतदार संघातील विविध रस्त्यांच्या कामासाठी संसदेच्या चालु पावसाळी अधिवेशनात 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे आमदार यशवंत माने यांनी दिली. प्रक्रिया पूर्ण केल्याने आता त्या विभागाचाही 50 कोटी रुपयांचा निधी मिळणार असल्याचे आमदार माने यांनी सांगितले.

दरम्यान शासनाच्या "2515" या योजने अंतर्गत 30 कोटी रुपये, नगर विकास विभागाकडून मोहोळ नगर परिषदेसाठी 10 कोटी व अनगर नगरपंचायती साठी 10 कोटी रुपयांचा निधी येत्या पंधरा दिवसात प्राप्त होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विशेष प्रयत्नातून हा निधी मिळाल्याचे आमदार माने यांनी सांगितले.

मोहोळ विधानसभा मतदार संघातील विविध रस्त्यांची अवस्था फारच बिकट झाली आहे त्यामुळे किरकोळ अपघात व नागरिकांना हाडांच्या आजाराचे प्रमाण वाढले आहे. या निधीच्या माध्यमातून रस्ते झाले तर नागरिकांचा त्रास कमी होणार असून दळणवळणा साठी वेग येणार आहे.

yashwant mane
Solapur Rain Update : मोहोळ तालुक्यात केवळ 20 टक्केच पेरणी, मोठ्या पावसाची गरज

या निधी पैकी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्या खालील रस्त्यासाठी 15 कोटी 70 लाख रुपये, जिल्हा परिषदेच्या अधिपत्या खालील रस्त्यांच्या कामासाठी 7 कोटी 70 लाख, मोहोळ विधानसभा मतदार संघाला पंढरपूर तालुक्यातील जोडलेल्या गावातील रस्त्यासाठी एक कोटी 80 लाख रुपये मंजूर झाले आहेत.

रस्ते व त्यासाठी मंजूर झालेला निधी पुढील प्रमाणे

मोहोळ तालुका- सार्वजनीक बांधकाम विभाग

एकुण निधी 15 कोटी 50 लाख

  • राष्ट्रीय महामार्ग- 965 ते खंडाळी,पापरी, पेनुर, टाकळी सिकंदर,कोथाळे रस्ता सुधारणा करणे-4 कोटी रूपये

  • मोहोळ, तांबोळे, सौंदणे, वरकुटे, औंढी, वडदेगाव, बेगमपूर रस्ता सुधारणा करणे-5 कोटी रुपये,

  • देवडी, खंडोबाचीवाडी, अनगर, बिटले, मलिकपेठ रस्ता सुधारणा करणे-1 कोटी रुपये,

  • मोहोळ, घाटणे, हिंगणी, खुनेश्वर रस्ता सुधारणा करणे- 2 कोटी रुपये,

  • सावळेश्वर, पोफळी, अर्जुनसोंड, लांबोटी, सोलापूर, वडाळा रस्ता सुधारणा करणे-3 कोटी 50 लाख रुपये.

yashwant mane
Solapur Accident : कुर्डुवाडीत मद्यधुंद तरुणाचा थरार; पोलिसांची जीप पळवून दुचाकींना दिली धडक

जिल्हा परिषद

एकुण निधी -7 कोटी 70 लाख

  • बिटले ते अनगर रेल्वे स्टेशन रस्ता सुधारणा करणे-1कोटी 50 लाख

  • भोयरे ते राज्यमार्ग 141 रस्ता सुधारणा करणे- 60 लाख

  • आष्टे, भांबेवाडी रस्ता सुधारणा करणे-1 कोटी रुपये

  • कोन्हेरी ते येवती रस्ता सुधारणा करणे-1 कोटी रुपये

  • 5) वडवळ ते ढोक बाभूळगाव रस्ता सुधारणा करणे-1 कोटी रुपये

  • विरवडे बुद्रुक, दादपूर ते कामती बुद्रुक रस्ता सुधारणा करणे-1 कोटी 60 लाख रुपये

  • देगाव, बोपले, एकुरुके, नरखेड रस्ता सुधारणा करणे-1 कोटी रुपये

yashwant mane
Solapur : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा पर्यावरण भुषण पुरस्कार प्रविण तळेंना जाहीर

पंढरपूर तालुका -जिल्हा परिषद

एकुण निधी 1कोटी 80 लाख

  • पुळूज ते बाबरमळा रस्ता सुधारणा करणे- 80 लाख रुपये

  • सरकोली ते खटकाळे वस्ती रस्ता सुधारणा करणे-1कोटी रुपये

दरम्यान अगोदरच्या शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात ग्रामविकास, जलसंधारण, सार्वजनिक बांधकाम व पर्यटन या विभागाच्या 50 कोटी रुपयांच्या निधीवर "स्टे" होता, मात्र तो उठविण्याची.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.