Pandharpur News : आषाढी नवमी दिवशीच पंढरीत पाच लाखाहून अधिक भाविक दाखल

यंदा भाविकांचे विक्रमी गर्दी होण्याची शक्यता
Pandharpur News
Pandharpur News Esakal
Updated on

पंढरपूर : आषाढी एकादशीच्या सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी राज्यातील विविध भागांसह, गोवा, कर्नाटक व तेलंगणा राज्यातील लाखो भाविकांच्या आगमनाने पंढरी नगरी फुलून गेली आहे. यंदा आषाढी नवमीच्या दिवशी सोमवारी (ता.१५) सुमारे ५ लाखाहून अधिक भाविक विठ्ठल नगरीमध्ये दाखल झाले असून आषाढी एकादशीच्या दिवशी तर विक्रमी गर्दी होण्याची शक्यता आहे. दरम्यान श्री विठ्ठलाच्या दर्शनाची रांग यंदा प्रथमच १२ नंबरची पत्रा शेड भरून गोपाळपूर पूलापर्यंत गेली असून 'श्री'च्या दर्शनासाठी १८ ते २० तासांचा अवधी लागत आहे.

Pandharpur News
Chhagan Bhujbal News: आरक्षणाच्या मुद्द्यावर भुजबळांनी पवारांना गोत्यात आणलं?

आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी आळंदी व देहू येथून पायी चालत निघालेल्या दिंड्या व सर्व मानाच्या संतांच्या पालख्यांचे सोमवारी वाखरी येथील पालखीतळावर आगमन झाले होते. याशिवाय राज्यातील अन्य भागातून रेल्वे, एसटी व आपल्या खासगी वाहनातून दाखल झालेल्या लाखो भाविकांमुळे पंढरी नगरी गजबजून केली आहे. श्री विठ्ठल मंदिर परिसर, भक्ती सागर (६५ एकर), प्रदक्षिणामार्ग, चंद्रभागा नदीचे वाळवंट, पत्राशेड दर्शनरांग आदी परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेले आहेत. मागील वर्षीपेक्षा यावर्षी भाविकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यंदा नवमीलाच सुमारे पाच लाखाहून अधिक भाविक पंढरीत दाखल झाले असून पंढरीतील सर्व मठ, लॉज, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे वेदांत व नवीन भक्तनिवास हाउसफुल्ल झाले आहे. दरम्यान, आषाढी नवमी दिवशी श्री विठ्ठलाच्या दर्शनाची रांग यंदा प्रथमच नव्याने उभारण्यात आलेल्या गोपाळपूर रस्त्यालगतच्या ११ व १२ नंबर शेड भरून गोपाळपूर

Pandharpur News
Nashik Accident News : आयशर चालकाच्या वैदयकीय चाचणी अहवालाची प्रतिक्षा

पूलापर्यंत गेली आहे. मागील वर्षी आषाढी नवमीला दर्शन रांग दहा नंबर पत्रा शेडमध्येच होती. मात्र यंदा ही रांग गोपाळपूर रस्त्यावर गेली आहे. त्यामुळे यंदा आषाढी यात्रेला येणाऱ्या भाविकांची विक्रमी गर्दी होण्याची शक्यता आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती व जिल्हा प्रशासनाच्या वतीने यंदा पत्राशेड मधील दर्शन रांगेतील भाविकांसाठी दर्शन रांग परिसरामध्ये ४ विश्रांती कक्ष, २७ आपत्कालीन मार्ग, हिरकणी कक्ष, आयसीयु बेड कक्ष, कुलर, डास मारण्याची मशीन, प्लास्टिक क्रशिंग वेंडिंग मशीन, स्वच्छतागृहे, लाईव्ह दर्शन आदी सुविधा उपलब्ध केल्या आहेत. दर्शन रांगेत अनेक तास उभे राहून थकल्या नंतर काही काळ विश्रांतीसाठी भाविकांना रांगेतून बाहेर विश्रांती कक्षात सोडले जात होते. मात्र किती नंबरच्या पत्रा शेड मधून भाविक रांगे बाहेर आले हे कळण्यासाठी त्या भाविकाच्या हातावर यंदा प्रथमच स्टॅम्पिंग करण्यात येत आहे. व त्या भाविकाच्या हातावरील स्टॅम्प पाहूनच पुन्हा रांगेत प्रवेश देण्यात येत आहे. त्यामुळे घुसखोरीला मोठ्या प्रमाणावर आळा बसला आहे.

Pandharpur News
Nashik News : परस बागेसाठी फळ, फूल रोपांना पसंती; पावसाच्या आगमनानंतर विक्री जोमाने

दरम्यान आज नवमी दिवशी श्री विठ्ठल मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आलेले भाविक लक्ष्मण कोंडीबा वाघमोडे (रा. दिंडेवाडी, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर) 'सकाळ'शी संवाद साधताना म्हणाले, आम्ही रविवारी (ता.१४) दुपारी चार वाजता दहा नंबरच्या पत्रा शेडमधील दर्शन रांगेत उभे होतो. जवळपास वीस तासांनंतर सकाळी बारा वाजता आम्हाला श्री विठ्ठलाचे पददर्शन प्राप्त झाले. प्रशासनाने यंदा दर्शनरांगेत चांगल्या सुविधा पुरवल्यामुळे कोणतीही गैरसोय झाली नाही. श्री विठ्ठलाच्या मुखदर्शनाची रांग सोमवारी दुपारी प्रदक्षिणा मार्गावरील परिचारक वाड्या पर्यंत गेली होती. मुखदर्शनासाठी दीड ते दोन तासांचा अवधी लागत होता.

आषाढी यात्रेसाठी पंढरीमध्ये यंदा भाविकांची विक्रमी गर्दी होण्याची शक्यता

यावर्षी जून जुलै मध्ये राज्यभरामध्ये सर्वदूर चांगला पाऊस पडल्याने शेतीची कामे आटपल्याने बहुतांश शेतकरी आषाढी यात्रा सोहळ्यामध्ये सहभागी झाले आहेत. पालखी सोहळ्या समवेत पायी चालत निघालेल्या दिंडीतील वारकऱ्यांच्या संख्येत यंदा लक्षणीय वाढ झाली आहे. याशिवाय आजवर आषाढी नवमी दिवशी गोपाळपूर पत्रा शेड दर्शन रांग दहा नंबर पत्रा शेड भरून कधीही पुढे गेली नव्हती. प्रशासनाने भाविकांच्या संख्येत होणारी वाढ गृहीत धरून यंदा प्रथमच पत्रा शेड बाहेरील गोपाळपूर रस्त्यालगत नव्याने अकरा व बारा नंबरची पत्र शेड उभारली आहे. या दोन्ही पत्रा शेड भरून दर्शन रांग गोपाळपूर पुलापर्यंत गेली आहे. एकंदरीतच यावर्षी आषाढीला भाविकांची विक्रमी गर्दी होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.